शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Gauhar Khan : कोरोना नियमांचे उल्लंघन करणं अभिनेत्री गौहर खानला पडलं महागात; FIR दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 15:36 IST

BMC files FIR against Bollywood actor for violating corona rules : ट्विटमध्ये बीएमसीने अभिनेत्रीचे नाव जाहीर केले नाही.

ठळक मुद्दे अभिनेत्री गौहर खानविरोधात हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

बीएमसीने ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं आहे. ज्यात एका बॉलिवूड अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल केल्याचं सांगण्यात आलं आहे. ट्विटनुसार या अभिनेत्रीवर असा आरोप आहे की, कोरोनाची लागण असूनही ती नियमांचे उल्लंघन करत बाहेर फिरत आहे. ट्विटमध्ये बीएमसीने अभिनेत्रीचे नाव जाहीर केले नाही.बीएमसीचे अधिकारी अभिनेत्रीच्या घरी पोहोचलेत्याचबरोबर बॉलिवूडच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री गौहर खानविरोधात हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. असं सांगितलं जात आहे की, गौहरवर आरोप आहे की, तिला कोरोनाची लागण झाली आहे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. जेव्हा बीएमसीचे अधिकारी गौहर खानच्या घरी तपासणीसाठी पोहोचले तेव्हा ती तेथे सापडली नाही.त्याचवेळी, एबीपी न्यूजने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बीएमसीने या ट्विटमध्ये एफआयआरची एक प्रतही शेअर केली आहे, परंतु त्यामध्ये तिचे नाव ब्लर करण्यात आले आहे. बीएमसी हे नाव उघड करू इच्छित नाही. 

त्याचवेळी, मुंबई पोलिसांचे प्रवक्ते एस. चैतन्य यांनी सांगितले की, गौहर खान Gauhar Khan यांच्याविरुध्द ओशिवार पोलिस ठाण्यात भादंवि कलम 188, 269, 270, 51  अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले, गौहर खानला कोरोनाची लागण झाल्याचे समजले गेले आहे आणि ती नियमांचे उल्लंघन करत घराबाहेर चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. यापूर्वी गौहरच्या वडिलांचे निधन झालेअलीकडेच अभिनेत्री गौहर खान हिच्यावर आज दु:खाचा डोंगर कोसळला. दीर्घकाळापासून आजारी असलेलय तिच्या वडिलांचे मार्च महिन्यात निधन झाले.जफर अहमद खान असं गौहर खानच्या वडिलांचे नाव आहे. गेल्या गौहरचे वडील अनेक दिवसांपासून रूग्णालयात भरती होते. 

 

सलमान खानचा भाऊ अरबाज यांनीही कोरोना नियमांचे उल्लंघन केलेकाही महिन्यांपूर्वी युएईहून परत आल्यानंतर संगरोध नियमांचे उल्लंघन न केल्याबद्दल बीएमसीने सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान आणि सोहेलचा मुलगा आर्यन यांच्यावर कारवाई केली. मग सर्वांना मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये क्वारंटाईन ठेवण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईMuncipal Corporationनगर पालिकाbollywoodबॉलिवूडGauhar Khanगौहर खान