शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात ब्लॅकमेल करुन महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार; अल्पवयीन मुलीसह तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 15:56 IST

मोबाईलमध्ये काढलेल्या फोटोवरुन ब्लॅकमेल करीत एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना माजलगावात उघडकीस आली आहे.

बीड / माजलगाव : मोबाईलमध्ये काढलेल्या फोटोवरुन ब्लॅकमेल करीत एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना माजलगावात उघडकीस आली आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन घेत पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना ताब्यात घेतले आहे. आणखी एक आरोपी फरार असून, तिच्या शोधात पथके रवाना झाली आहेत.

माजलगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयात पीडित तरुणी शिक्षण घेत होती. ग्रामीण भागातील असल्याने ती शहरातच किरायाने राहत होती. येथेच तिची एका मुलीसोबत मैत्री झाली. मैत्रिणीने पीडितेच्या एका मुलासोबत ओळख करुन दिली. तिच्याच खोलीवर नेले. तेथे प्रकरणातील मुख्य आरोपी आशिश ओमप्रकाश बोरा या तरुणाला बोलावून घेतले. दोघांना कोंडून घेतले. आशिशने पीडितेशी अश्लील चाळे केल्याचे फोटो त्या मैत्रिणीने टिपले. याच फोटोवरुन तिला ब्लॅकमेल केले जात असे.

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्या मैत्रिणीने आपल्या दुसरा मित्र मनोज फुलारे यालाही ते फोटो पाठविले. मनोजनेही पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हा त्रास असह्य झाल्याने पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने यात ती बचावली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठत झालेला अन्याय कथन केला. त्याप्रमाणे पीडितेची मैत्रिण, आशिश बोरा, मनोज फुलारे, प्रमोद कदम व अन्य एका महिलेविरोधात अत्याचार, विनयभंग, पोक्सो, आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. उप विभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके, पोलीस निरीक्षक एस. डी. महाजन यांनी या प्रकरणात तपास चालू केला आहे. माजलगाव पोलीस या प्रकरणात खोलवर जाऊन मुख्य आरोपींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मुख्य आरोपीला पुण्यात बेड्याप्रकरणातील मुख्य आरोपी आशिश बोरा याला पुण्यातून बेड्या ठोकल्या, तर मनोज फुलारे व पीडितेची मैत्रिण यांना माजलगावातच ताब्यात घेतले. यापूर्वीच प्रमोद कदम याला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करणारी मुख्य महिला आरोपी अद्यापही फरार आहे. तिलाही लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास माजलगाव पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारBeedबीडCrimeगुन्हा