शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

काळवीट शिकार प्रकरण : अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 21:21 IST

उद्या सलमान जर जोधपूर कोर्टात राहिला नाही तर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकोर्टात सलमान हजर न राहिल्यास कोर्ट सलमानचा जामीन रद्द करू शकतात आणि त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.  1998 च्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दोषी ठरवले होते.

मुंबई - काळवीट शिकार प्रकरणी अभिनेतासलमान खानला जोधपूर कोर्टात उद्या हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्या सलमान जर जोधपूर कोर्टात राहिला नाही तर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोर्टात सलमान हजर न राहिल्यास कोर्ट सलमानचा जामीन रद्द करू शकतात आणि त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

1998 च्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानलाजोधपूर न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दोषी ठरवले होते. याप्रकरणी त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने हा निकाल 5 एप्रिल 2018 ला दिला होता. ही शिक्षा माफ व्हावी यासाठी सलमानच्या वकिलांकडून जोधपूर कोर्टात निवेदन करण्यात आले असून सध्या ही केस कोर्टात सुरू आहे. पण सलमानची या खटल्यातून अद्याप तरी सुटका झालेली नाही. याउलट दिवसेंदिवस सलमानच्या अडचणीत वाढ होत आहे.

सलमान कोर्टात हजर राहात नसल्याने न्यायाधीशांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. मागील सुनावणीदरम्यान न्यायधीशांनी या तारखेला सलमानच्या वकिलांना सांगितले होते की, सलमानने पुढील तारखेला कोर्टात हजर राहावे अन्यथा त्याचा जामीन फेटाळला जाईल. गेल्या तारखेला देखील सलमानने कोर्टात हजेरी लावली नव्हती, त्यावेळी सलमानला कोर्टात हजर राहाण्याविषयी सलमानच्या वकिलांना सांगण्यात आले होते. पण तरीही सलमान या तारखेला देखील उपस्थित राहिला नसल्याने न्यायधीशांनी त्याच्या वकिलांना सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे उद्याच्या सुनावणीला सलमान कोर्टात हजर राहिला नाही तर त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. हम साथ साथ है या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरू असताना सलमान आणि या चित्रपटातील त्याच्या काही सहकलाकारांनी काळवीटाची शिकार केली असल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणात सलमानला दोषी ठरवण्यात आले असले तरी त्याचे सहकलाकार अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले होते.सलमानला जीवे मारण्याची धमकी काळवीट शिकार प्रकरणी सुनावणीसाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान शुक्रवारी (दि.२७) जोधपूरच्या कोर्टात हजर होणार आहे. तत्पूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. राजस्थान पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली असून चौकशीही सुरु केली आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त डी. सिंह यांनी अशा प्रकारे धमकी देणाऱ्यांमागे कोण आहे हे शोधण्याचे काम आम्ही करीत आहोत. जर ते कोण आहेत हे समजले तर आम्ही योग्य ती कारवाई करु. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाईल अशी माहिती दिली. 

टॅग्स :Blackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरणSalman Khanसलमान खानJodhpur courtजोधपूर न्यायालयMumbaiमुंबई