शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

'ते शांत बसलेले, गणपत गायकवाड उठले, नेम धरला...'; नेमकं काय घडलं?, पोलिसांनी सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 11:19 IST

पोलीस स्थानकांत त्यावेळी नेमकं काय घडलं, याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

Ganpat Gaikwad: भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात मध्यरात्री उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी, गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

'राज्यात कायदा, सुव्यवस्थेचे मुडदे पडलेत, गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार'; राऊतांचा हल्लाबोल

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिनमध्ये शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचे साथीदार राहुल पाटील व भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये एका विषयावरून सुरवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ व गोळीबार झाला. गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकातच गोळीबार केला. यामध्ये महेश गायकवाड यांना ४ तर राहुल पाटील यांना २ गोळ्या लागल्या आहेत. पोलीस स्थानकांत त्यावेळी नेमकं काय घडलं, याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक; CM शिंदेंवर केले गंभीर आरोप

गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही तक्रार देण्यासाठी आले होते. दोघांमध्ये काही चर्चा सुरु होती. त्यादरम्यान अचानाक आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्याने गोळीबार केला. आपल्याकडे सीसीटीव्हीचे भक्कम पुरावे आहेत. गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेने त्यांच्यावर नेम रोखून गोळीबार केला. त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर ठिकाणी लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत सहा गोळ्या जखमींच्या शरीरातून काढण्यात आल्या आहेत. 

होय, मी गोळीबार केला-

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबिनमध्येच गोळी झाडल्याची ही घटना घडली आहे. पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केल्याचं गणपत गायकवाड यांनी कबूल केलं. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती. त्यामुळे  माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं, असे गणपत गायकवाड यांनी सांगितले. 

गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप-

आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मी मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना कल्पना दिली होती. ही लोकं माझा वारंवार अपमान करतात. मी केलेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा फलक लावला जातो, असेही आमदार गायकवाड म्हणाले. 

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडFiringगोळीबारulhasnagarउल्हासनगरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMahesh Gaikwadमहेश गायकवाड