शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाला आलेल्या मुलीची छेड काढली; तीन मुलांना अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: September 28, 2024 23:10 IST

पोलिसांनी तिघांना अटक केली असून, न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

लातूर : ‘तुझा मोबाइल नंबर माझ्या मोबाइलवर डायल करून दे’ म्हणत एका १६ वर्षीय मुलीची छेड काढल्याप्रकरणी लातुरातील गांधी चौक पोलिस ठाण्यात तिघांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी सांगितले, पीडित अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिने वाढदिवसाला बोलावले होते. या वाढदिवसाचे आयोजन लातुरातील गंजगोलाई परिसरातील एका कॅफेत करण्यात आले होते. मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने ती कुटुंबीयांना सांगून कॅफेत दाखल झाली. यावेळी कॅफेत वाढदिवसाला हजर असलेल्या तिघांमधील एकाने पीडितेला ‘तुझा मोबाइल नंबर माझ्या मोबाइलमध्ये डायल कर’ असा आग्रह केला असता, पीडित मुलीने याला विरोध केला. 

तिघांपैकी एकाने तिच्यासोबत जबरदस्ती केली. या प्रकारावरून वाद निर्माण झाला. आपल्यासोबत घडलेला प्रकार पीडित मुलीने कुटुंबीयांना सांगितला. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुरनं. ६२७/२०२४ कलम ७५ (१) २, ४९, बीएनएस, ३ (१) पोक्सो कायद्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी केली तिघांनाही अटक!गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने शाहीद शेख, अल्ताफ शेख आणि जमीर शेख यास अटक केली. त्यांना शनिवारी लातूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.-डॉ. अजय देवरे, अपर पोलिस अधीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी