शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बर्थडे बॉयला वाढदिवसाचे सेलिब्रेशन महागात! हातात शोभेचा पाऊस, अन डोक्यावर पीठ टाकल्याने उडाला भडका आणि..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 12:49 IST

Crime News: एका तरुणाचा वाढदिवस साजरा केला जात असताना हे विचित्र सेलिब्रेशन बर्थडे बॉयच्या चांगलंच अंगाशी आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

अंबरनाथ - एका तरुणाचा वाढदिवस साजरा केला जात असताना हे विचित्र सेलिब्रेशन बर्थडे बॉयच्या चांगलंच अंगाशी आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणाच्या डोक्यावर पीठ टाकल्याने शोभेच्या पावसाच्या आगीमुळे या पीठाने पेट घेतला आणि त्या तरुणाचा चेहरा भाजला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ अंबरनाथच्या बुवापाडा परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये राहुल नावाच्या एका तरूणाचा वाढदिवस साजरा केला जात होता. यासाठी केकवर हल्ली वापरला जाणारा शोभेचा पाऊस लावण्यात आला. तर असाच शोभेचा पाऊस पेटवून या तरुणाच्या तोंडात धरण्यासाठी देण्यात आला. यानंतर या तरुणावर अंडी फेकून मारण्यात आली. त्यामुळे तोंडातील जळत असलेला शोभेचा पाऊस या तरुणाने हातात पकडला. याचवेळी या तरुणाच्या अंगावर त्याच्या एका मित्राने पीठ टाकले. मात्र यामुळे आगीचा मोठा भडका उडाला, ज्यात बर्थडे बॉय चांगलाच होरपळून निघाला. या घटनेबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. राहुल नावाचा हा तरुण बुवापाडा परिसरात नेमका कुठे राहतो? हे अद्याप समजू शकलेले नसून या व्हिडिओनंतर हल्लीच्या तरुणांची वाढदिवस साजरा करण्याची विचित्र पद्धत जीवावरही कशी बेतू शकते? हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीambernathअंबरनाथ