शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कामगार अधिकाऱ्याच्या घरात कोट्यवधींचे घबाड; नोटा मोजण्यासाठी मागवावं लागलं मशीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 09:14 IST

पाटणा, हाजीपूर आणि मोतीहारी येथे दक्षता विभागाची कारवाई 

पाटणा : दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी हाजीपूरचे जिल्हा कामगार अधिकारी दीपक कुमार शर्मा यांच्या घरी केलेल्या छापासत्रात कोट्यवधींची रोकड आणि मोल्यवान दागिने जप्त केले आहेत. या अधिकाऱ्याने अवैध मार्गाने कोट्यवधींची संपत्ती जमविली असल्याची माहिती दक्षता विभागाला मिळाली होती. त्यानुसार पाटणा, हाजीपूर आणि मोतीहारी या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली आहे. पाटणातील दीघा परिसरात असलेल्या महावीर कॉलनीतील दीपक कुमार यांच्या घरातून नोटांनी भरलेल्या बॅगा आणि पोती जप्त करण्यात आली आहेत. त्याच्या घरांतून जप्त केलेली रोकड दोन कोटींहून अधिक असेल, असा अंदाज आहे.कारवाई करीत असताना समोर येत असलेली संपत्ती पाहून सर्व अधिकारीही चक्रावून गेले. अधिकाऱ्यांना घरात सोने-चांदीचे दागिने, सोन्याची बिस्कीटे, मौल्यवान हिरे, डझनभर क्रेडिट कार्ड आणि जमिनीची कागदपत्रे आढळून आली आहेत. यामुळे एकूण संपत्तीचा आकडा अधिक असणार आहे. नोटा मोजण्यासाठी मागवली मशीन कारवाईदरम्यान लक्षात असे आले की, सापडेल्या नोटांचे प्रमाण खूप आहे. तिथे असलेल्या अधिकाऱ्यांनी नोटांची मोजदाद कऱणे शक्य नव्हते. त्यामुळे अखेर नोटा मोजण्याची मशिन मागवावी लागली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी