शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अमळनेरसह मध्यप्रदेशातून दुचाकी लांबविणारा चोरटा जेरबंद

By सागर दुबे | Updated: March 19, 2023 20:57 IST

कारवाई दरम्यान १४ दुचाकी हस्तगत

सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर शहरासह मध्यप्रदेश राज्यातून दुचाकी चोरणा-या अट्टल चोरट्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या १४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अजय अंबालाल पावरा (२७, रा. वकवड-बोराडी, ता. शिरपूर, जि.धुळे) असे अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चोपडा, अमळनेर परिसरामध्ये दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ तयार केले होते. या पथकाकडून चोपडा, अमळनेर परिसरामध्ये पेट्रोलिंग सुरू होती. अखेर शनिवारी अमळनेरमध्ये एक तरूण विना क्रमांकाची दुचाकी घेवून फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी अमळनेर शहर गाठून तरूणाचा शोध घेवून त्याला पकडले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने अजय अंबालाल पावरा असे त्याचे नाव सांगितले. खाक्या दाखविताच त्याने अमळनेर शहरासह मध्यप्रदेश राज्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याशिवाय पोलिसांना १४ दुचाकी सुध्दा त्याने काढून दिल्या. पुढील कार्यवाहीसाठी त्याला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई- ही कारवाई पोलिस वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रवी नरवाडे, राजेश मेढे, संजय हिवरकर, गोरख बागुल, कमलाकर बागुल, संदीप पाटील, संदीप साळवे, प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, अशोक पाटील यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी