शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अवैध संबंधात अडथळा ठरायचा पती; डोळे-नाक-कानात फेविक्विक टाकून निर्घृण हत्या

By कुणाल गवाणकर | Updated: January 24, 2021 12:53 IST

पत्नीनं माहेरच्या व्यक्तींसोबत मिळून केली हत्या; मृतदेह जाळायच्या तयारीत असताना उलगडा

गया: विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीनं हत्या केली आहे. माहेरच्या माणसांसोबत मिळून पत्नीनं पतीचा अतिशय निर्घृणपणे खून केला. गया जिल्ह्यातल्या मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीच्या नातेवाईकांनी आधी पतीला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोळ्यात, कानात, नाकात फेविक्विक टाकून त्याच्यावर चाकूनं वार केले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.सलेमपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या मुन्ना गुप्ताची पत्नी जुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याची माहिती मुन्नाला मिळाली. त्यानं पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. तेव्हापासून मुन्ना आणि जुलीमध्ये वाद सुरू होते. शुक्रवारीदेखील दोघांमध्ये याच विषयावरून वाद झाला. त्यानंतर जुलीनं तिचे आई, वडील आणि अन्य कुटुंबियांसह मुन्नाला मारहाण केल्याच आरोप आहे.बेदम मारहाणीमुळे मुन्ना बेशुद्ध पडला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या डोळ्यात, कानात, नाकात फेविक्विक टाकलं. आरोपी इथेच थांबले नाहीत. त्यांनी मुन्नाच्या शरीरावर चाकूनं वार केले. यानंतर आरोपींनी मुन्नाचा मृतदेह एका गोणीत भरला. मृतदेह जाळण्यासाठी आरोपी घराबाहेर पडले. ते पेट्रोल खरेदी करण्यासाठी निघाले असताना पोलिसांना संशय आला आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.पोलिसांना पाहताच आरोपी दुचाकी आणि मृतदेह टाकून पळू लागले. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून आरोपींची शोधाशोध सुरू केली. मुन्नाची पत्नी जुली, त्याचे सासरे दुर्गा साव आणि सासू संजू देवी यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :Murderखून