शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या वरातीत नाचत होते वऱ्हाडी इतक्यात ७ वर्षांच्या मुलीला शेजाऱ्यानं पळवलं, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 21:03 IST

बिहारमधील बेगुसरायमध्ये लग्नाच्या वरातीत नाचण्यात सर्वजण मग्न असताना एका ७ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

बिहारमधील बेगुसरायमध्ये लग्नाच्या वरातीत नाचण्यात सर्वजण मग्न असताना एका ७ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ज्या घरात लग्न होतं त्याच घरातील मुलीचं आरोपीनं अपहरण केलं होतं. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार होता. त्याला पकडणं पोलिसांसाठी आव्हान होतं.

संबंधित घटना 21 मार्च सोमवारची आहे. बेगुसराय जिल्ह्यातील एफसीआय ओपी परिसरात झालेल्या एका लग्न समारंभातून आरोपीनं सात वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं होतं. आरोपी मोहम्मद जमशेद उर्फ ​​कारुआ हा तरुणीचा शेजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपीनं मुलीचं अपहरण करून तिला शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. घटनेनंतर आरोपीनं मुलीचा गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपी मुलीला बेशुद्धावस्थेत सोडून पळून गेला. कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेतला असता, मुलगी बेशुद्ध अवस्थेत शेतात आढळून आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तपासाअंती पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं, जिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत. एसपी योगेंद्र कुमार यांनी सांगितलं की, डीएसपी अमित कुमार आणि मुख्यालयाचे डीएसपी निशित प्रिया या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. त्याचवेळी पोलिसांच्या पथकानं आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूर एफएसएल टीमनं घटनास्थळावरून पुरेसे पुरावे गोळा केले आहेत. एसपींच्या म्हणण्यानुसार, तपास पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल केलं जाईल आणि आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करतील. सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार