शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

५ किमी पायपीट करत मुलीनं गाठलं पोलीस स्टेशन; त्यानंतर जे घडलं त्याने पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 17:16 IST

या मुलीची व्यथा ऐकून पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली.

नवादा - बिहारच्या नवादा जिल्ह्यात हिसुआ पोलीस ठाण्यात एक ८ वर्षीय मुलगी रडत रडत पोहचली तेव्हा तिथे उपस्थित असणारे सर्वच पोलीस हैराण झाले. ही मुलगी पोलीस स्टेशनमध्ये येताच अधिकारी कुठे आहेत असा प्रश्न करत राहिली. आईला न्याय मिळावा यासाठी ही मुलगी पोलिसांकडे मदतीची याचना करत होती. माझ्या आईला वाचवा असं ती वारंवार पोलीस अधिकाऱ्यांना म्हणत होती.

या मुलीची व्यथा ऐकून पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. हिसुआ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनवा गावात एका महिलेला तिचा दीर आणि सासू-सासरे घरगुती वादातून मारहाण करत होते. या घटनेत ती महिला जखमी झाली. आईला घरातील सर्वजण मारताना बघून ८ वर्षीय आराध्या कुमारी घाबरली होती. ही घटना पाहताच ती ५ किमी पायपीट करत थेट पोलीस स्टेशनला पोहचली. पोलीस ठाण्यात पोहचून तिने अधिकारी कोण आहेत अशी विचारणा केली? कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवताच ती मुलगी बेधडक त्यांच्याजवळ गेली आणि रडत रडत माझ्या आईला वाचवा असं म्हणत त्यांना संपूर्ण घटना सांगितली. मुलीचे हे कृत्य पाहून ठाण्यात उपस्थित असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अवाक् झाले. या मुलीने अधिकाऱ्याला म्हटलं की, माझ्या आईला वाचवा, माझ्या आईला छोटे पापा, दादा आणि दादी खूप मारत आहेत. तिला घरातून बाहेर हाकललं. माझी आई कुठे गेली मला माहिती नाही. माझे पप्पा दिल्लीत काम करतात आणि आई आता कुठे गेली माहिती नाही असं तिने रडत सांगितले. 

या मुलीची तक्रार ऐकल्यानंतर तात्काळ पोलिसांनी कार्यवाहीला सुरुवात केली. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी आसपासच्या लोकांकडूनही सत्यता पडताळून घेतली. घरातून निघालेल्या महिलेचा शोध घेत थेट मुलीसह घरी धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दिर, सासू-सासरे यांच्यावर कारवाई केली. पोलीस या प्रकरणात आणखी तपास करत आहेत. मुलं देवाघरची फुले असतात. तिने जे काही पाहिले त्याआधारे पोलिसांनी कार्यवाही केली. पोलीस नातेवाईकांचीही चौकशी करणार असल्याचं म्हणाले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी