शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'पती मित्रांसोबत माझ्यावर जबरदस्ती करतो', महिलेचा पतीवर खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:58 IST

Bihar Crime News : महिलेने आरोप लावला की, ती तिच्या चार मुलींसोबत नेपाली नगरमध्ये राहते. पण तिचा पती विनोद महतो तिच्यासोबत सतत मारहाण करतो आणि आपल्या मित्रांसोबत मिळून शारीरिक शोषण करतो.

Bihar Crime News : पटणामध्ये एका महिलेकडून तिच्या पतीबाबत खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. पीडित महिलेने पती आणि त्याच्या मित्रांवर मारहाण, शिवीगाळ आणि जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप लावला आहे. ही घटना नेपाली नगरमधील आहे. महिलेने काही लोकांच्या मदतीने पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने आरोप लावला की, ती तिच्या चार मुलींसोबत नेपाली नगरमध्ये राहते. पण तिचा पती विनोद महतो तिच्यासोबत सतत मारहाण करतो आणि आपल्या मित्रांसोबत मिळून शारीरिक शोषण करतो. महिलेने पोलिसांना सांगितलं की, घर आणि मुलांचा सगळा खर्च ती स्वत: करते. त्यानंतरही तिचा पती तिच्यासोबत अमानवीय वागणूक करतो. मारहाण केल्यामुळे तिचा एकदा गर्भपातही झाला आहे.

महिलेने आरोप केला की, आधी पती एकटाच तिचं शोषण करत होता. पण नंतर त्याच्या मित्रांना घरी आणू लागला आणि माझ्यासोबत ते जबरदस्ती करत होते. महिला याचा विरोध करत होती, पण तिला खूप मारहाण केली जात होती.

महिला पोलिसांच्या वागण्यावरूनही खूप नाराज आहे. ती म्हणाली की, तिने बिहार पोलिसांच्या 112 नंबरवर फोन केला होता. पोलीस आलेही होते. घटनास्थळावरून पतीला पकडूनही घेऊन गेले. पण काही वेळाने त्याला सोडून दिलं. पती जेव्हा परत आला तेव्हा एकटा नव्हता. त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते. पतीने आधी तिला आणि नंतर मुलांना मारहाण केली. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला.

महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल आहे आणि घटनेची चौकशी करत आहेत. पटणा पोलिसांनुसार, सध्या या घटनेची चौकशी केली जात आहे आणि साक्षीदार मिळाल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. पोलीस अधिकाऱ्यांनाही माहीत आहे की, महिला स्वत: घर चालवते. मुलांना मारहाण केल्याचं स्पष्ट झालं आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी