शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चुलत भावाच्या प्रेमात पडली होती विवाहित महिला, त्याच्या लग्नाच्या सहा दिवसांनंतर केली त्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:53 IST

Bihar Crime News : घटनेच्या काही दिवसांनंतर जेव्हा तरूणाच्या सडलेल्या मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना मृतदेह आढळून आला.

Bihar Crime News : बिहारच्या वैशालीमधून प्रेम प्रकरणाची आणि हत्येची एक अशी घटना समोर आली आहे ज्यावर सहज विश्वास बसणार नाही. तरूणाने लग्न केलं हे त्याच्या चुलत बहिणीला सहन झालं नाही आणि याच रागातून तिने चुलत भावाच्या हत्येचा प्लान केला. पार्टीच्या बहाण्याने तिने सख्खा भाऊ, पतीच्या माध्यमातून चुलत भावाला घरी बोलवलं. पार्टी केली आणि मग त्याची हत्या केली. घटनेच्या काही दिवसांनंतर जेव्हा तरूणाच्या सडलेल्या मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना मृतदेह आढळून आला.

हत्येचं हे प्रकरण हाजीपूरमधील आहे. मृतकाच्या मृतदेहाची स्थिती अशी होती की, त्याला ओळखंणी अवघड झालं होतं. पण जवळच सापडलेल्या त्याच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटली. ज्यानंतर प्रकरणाचा खुलासा झाला. वैशालीच्या लोमामध्ये राहणाऱ्या आशा देवी यांनी 24 वर्षीय मुलगा मनीष कुमारबाबत एक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत घराजवळच्या तीन लोकांनी त्यांचा मुलगा मनीष याला पार्टीसाठी बोलवलं होतं असा आरोप करण्यात आला होता.

आशा देवी यांनी 21 जूनला पोलिसात लिखित तक्रार दिली होती. ज्यानंतर पोलीस मनीष कुमारचा शोध घेत होते. 26 जूनला सायंकाळी लोमाच्या पंचायत सरकार भवनमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती समोर आली. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा मृतदेहाची स्थिती इतकी वाईट होती की, त्याला ओळखणंही अवघड झालं होतं. मृतदेहाचा चेहरा ठेचण्यात आला होता आणि तर शरीरावर जखमांचे निशाण होते. बरेच दिवस होऊ गेल्याने शरीर सडलं होतं. पण जवळच मिळालेल्या कपड्यांमुळे मनीष कुमारची ओळख पटली. 

मनीषचं लग्न याच वर्षी 15 जूनला झालं होतं. याआधी मनीषचं घराच्या बाजूलाच राहत असलेल्या त्याच्या चुलत बहिणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. त्याची चुलत बहीण विवाहित आहे. असं सांगितलं जात आहे की, तरूणी मनीषला प्रेमाला जाळ्यात अडकवून त्याची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत होती. पण मनीषचं लग्न झाल्याने तिचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं. मग तिने भाऊ आणि पतीच्या मदतीने मनीषच्या हत्येचा प्लान केला. आता पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी