शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मस्करीची कुस्करी! मेहुण्याच्या लग्नाला गेलेल्या भावोजींना उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 23:22 IST

तरुणाला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू; आरोपी फरार

बांका: बिहारच्या बांका जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला काही तरुणांनी उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं. मस्करी सुरू असताना वाद झाला आणि त्यातून हा प्रकार घडला. उकळत्या तेलाच्या कढईत टाकण्यात आल्यानं व्यक्ती अतिशय गंभीररित्या भाजला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. 

बांका जिल्ह्यातल्या पहाडपूर येथे राहणारे पप्पू यादव २७ एप्रिलला महादेवावरण येथे गेले. तिथे त्यांच्या मेहुण्याचा विवाह होता. लग्नात विकास यादव आणि शिवा यादव यांनी पप्पू यादव यांची थट्टा केली. त्यावरून वाद झाला. यानंतर विकास आणि शिवा यांनी पप्पू यांना उचलून उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं.

वरातीच्या दिवशी पप्पू यादव घरासमोर असलेल्या बाजेवर झोपले होते. त्यावेळी दोनियार गावचे रहिवासी असलेल्या विकास यादव आणि अन्य तरुणांनी पप्पू यादव यांना गरम तेलाच्या कढईत टाकलं. पप्पू यादव यांच्या पाठीला इजा झाली. जखमी पप्पू यादव यांच्यावर कटोरियातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.