शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

मोठा ट्विस्ट! सोनाली फोगाट अन् पीए हे पती-पत्नी? गुरुग्रामच्या फ्लॅटने पेच आणखी वाढविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 08:55 IST

Sonali Phogat Death: सोनाली यांच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. शवविच्छेदन अहवालात प्रथमदर्शनी मात्र तसे काहीच दिसलेले नाही.

भाजपा नेता आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटच्या गोव्यातील संशयास्पद मृत्यूनंतर एकेक धक्कादायक रहस्ये बाहेर पडू लागली आहेत. तिच्या मृतदेहावर अनेक छोट्य छोट्या जखमा आढळून आल्या आहेत. तर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती आणि तिचा पीए दिसत आहेत. काही व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. असे असताना आता एक नवाच ट्विस्ट आला आहे. 

सोनालीचा मृत्यू हार्ट अॅटॅकने आल्याचे म्हटले गेले होते. यानंतर प्रकरण वाढू लागताच गोवा पोलिसांनी ड्रग थिअरी मांडली आहे. पोस्टमार्टेम झाल्यानंतर पोलिसांनी सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. गोवा पोलिसांनुसार सुधीरने सोनालीला जबरदस्तीने ड्रिंक पाजले होते, त्यात MDMA मिसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आता गुरुग्रामच्या फ्लॅट नंबर ९०१ ने या प्रकरणात वेगळच ट्विस्ट आणला आहे. 

सोनाली फोगाटने गुरुग्राममध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तो फ्लॅट तिने सुधीरसोबत मिळून घेतला होता. सेक्टर १०२ मध्ये हा फ्लॅट होता. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार सुधीरने हा फ्लॅट भाड्याने घेताना सोनाली ही त्याची पत्नी असल्याचे सांगितले होते. तसेच तिथे राहत असलेल्या लोकांनाही तो हेच सांगत होता. एवढेच नाही तर घर भाड्याने घेताना एक पोलीस व्हेरिफिकेशनही झाले होते. या फ्लॅटवर सोनाली गोव्याला निघण्यापूर्वी राहण्यासाठी गेली होती, असे समोर येत आहे. 

सुधीर आणि सोनाली या फ्लॅटवर आले. काही वेळ राहिले आणि त्यांची कार सोसायटीतच पार्क करून ते टॅक्सीने विमानतळाकडे निघाले. यावर पोलीस अधिक काही बोलण्याचे टाळत आहेत. 

भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट हिला जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचे संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांनी कबूल केले. एवढेच नव्हे तर सोनाली हिची मालमत्ता हडप करण्याच्या व त्यांचे राजकीय करिअर संपविण्याच्या उद्देशानेच खून केल्याचा पोलीस चौकशीत समोर आले आहे. गुरुवारी रात्री दोघांना अटक केली. त्यांना कोठडीसाठी न्यायालयात उभे केले जाईल, असे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी सांगितले. सोनाली यांच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. शवविच्छेदन अहवालात प्रथमदर्शनी मात्र तसे काहीच दिसलेले नाही. पोलीस आरोपींची कसून चौकशी करणार आहेत. दरम्यान, सोनाली फोगाट यांच्या पार्थिवावर शुक्रवारी हिसारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी यशोधराने तिच्या चुलतभावासह चितेला अग्नी दिला.

टॅग्स :Sonali Phogatसोनाली फोगाटHaryanaहरयाणा