शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Raj Kundra arrested: मोठी बातमी! अश्लील फिल्म निर्मितीप्रकरणी शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 23:03 IST

Bollywood actress shilpa shetty's husband and Businessman Raj Kundra arrested by mumbai police: या प्रकरणी फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करताना राज कुंद्रा हा यामागचा मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले होते.

ठळक मुद्देमालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये हे रॅकेट उघड़कीस आणले होते. रोवा आणि तिचा पती दीपंकरने हॉटहीट वेबसाइट तयार केली होती. यावरून अनेक पॉर्न व्हिडीओ शेअर केले आहेत.व्यवस्थापकीय संचालक ताब्यात आल्यावर कुंद्रा तपास यंत्रणाच्या रडारवर आले.

अश्लील फिल्म बनविणे (Porn Film) आणि त्यांचे काही अ‍ॅपद्वारे वितरण करणे या प्रकरणी बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवरा उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी चौकशी अंती ही कारवाई करण्यात आली आहे. (Raj kundra arrested by mumbai police for creation of pornographic films and publishing.)

 

मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये हे रॅकेट उघड़कीस आणले होते. या  कारवाईत यापूर्वी यास्मीन रसूल बेग खान उर्फ रोवा यास्मीन दीपंकर खासनवीस (४०), प्रतिभा नलावडे (३३), मोहम्मद आतिफ नासीर अहमद उर्फ सैफी (३२), मोनू गोपालदास जोशी (२६), भानुसूर्यम ठाकुर (२६), वंदना रविंद्र तिवारी उर्फ गहना वशिष्ठ (३२), उमेश कामत, दीपंकर खासनवीस (३८) यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यापाठोपाठ टँनला बेड्या ठोकल्या आहेत.

 

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रोवा आणि तिचा पती दीपंकरने हॉटहीट वेबसाइट तयार केली होती. यात दीपंकर हा सहसंचालक आहे. त्यांनी यावरून अनेक पॉर्न व्हिडीओ शेअर केले आहेत.  तर दुसरीकडे गहनाने परदेशस्थित कंपनीला विविध अश्लील फ़िल्म पाठवून लाखोंची कमाई केली. यात तिचे भारतातील काम पाहणारा उमेश कामत पथकाच्या हाती लागला. तो उद्योजक राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याच्या अटकेनंतर कुंद्रा तपास यंत्रणाच्या रडारवर आले. त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर सोमवारी त्यांच्याकड़े चौकशी करण्यात आली. चौकशीअंती सोमवारी रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेच्या वृत्ताला पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दुजोरा दिला आहे. 

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राShilpa Shettyशिल्पा शेट्टीMumbai policeमुंबई पोलीसArrestअटक