शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:40 IST

लॉरेंस गँग आणि पंजाब पोलिसांमधील सुत्रांनुसार साबरमती तुरुंगात कैदेत असलेला लॉरेंस आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांचा एक गट तसेच कॅनडातील गोल्डी आणि गोदारा यांचा दुसरा गट तयार झाला होता.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला, बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या कुप्रसिद्ध लॉरेंस गँगचे दोन तुकडे पडले आहेत. लॉरेंस गँगपासून गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा वेगळे झाल्याचे वृत्त आहे. लॉरेंस तुरुंगात गेल्यावर हे दोघेच परदेशातून गँग सांभाळत होते. 

लॉरेंस गँग आणि पंजाब पोलिसांमधील सुत्रांनुसार साबरमती तुरुंगात कैदेत असलेला लॉरेंस आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांचा एक गट तसेच कॅनडातील गोल्डी आणि गोदारा यांचा दुसरा गट तयार झाला होता. अद्याप या दोन्ही बाजूंकडून काही माहिती आलेली नाही. परंतू, सुत्रांनुसार लॉरेंन्स आणि गोल्डी यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. 

ब्रार आपल्यासोबत गोदाराला घेऊन बाजुला झाला आहे. लॉरेंसच्या सूचनेवरून हे दोघे कॅनडातून टोळी चालवत होते. पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्रासह इतर राज्यांत दहशत पसरवत आहेत. मोठमोठ्या व्यक्तींची हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी असे गुन्हे करत आहेत. एवढेच नाही तर ब्रार आणि गोदारा यांनी मिळून कॅनडा, अमेरिका, यूके, युरोपमध्ये लॉरेन्सच्या टोळीविरोधी गुंडांचे टार्गेट किलिंग केले आहे. अद्याप या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात काही केलेले नसले तरी ब्रार आणि गोदारा यांनी लॉरेन्स शिवाय कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. 

लॉरेन्स भारतात स्वतःला हिंदू गुंड म्हणून दाखवतो. तर गोल्डी ब्रारचे खलिस्तानी दहशतवाद्यांशीही संबंध आहेत. यामुळे या दोघांच्या विचारसरणी वेगवेगळ्या असल्याने त्यांच्यात फूट पडल्याचे सांगितले जात आहे. पंजाब पोलिसांच्या तपासातही अनेकदा गोल्डी ब्रार खलिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे, अस पंजाब पोलिसांनी सांगितल्याचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब