शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे पत्नी, पतीचा कोर्टासमोर धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 16:40 IST

Madhya Pradesh Crime News : आता महिला तरूणाला १० लाख रूपये मागत आहे. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी महिलासहीत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Madhya Pradesh Crime News :  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पती-पत्नीच्या नात्याची अजब घटना समोर आली आहे. इथे एका नर्सने स्वत:ला अविवाहित सांगून गुजरातच्या तरूणासोबत लग्न केलं. त्यानंतर केवळ १७ दिवसात पतीला फसवणुकीच्या आरोप तुरूंगात पाठवलं. इतकंच नाही तर महिलेने पतीवर आरोप लावला की, त्याने स्वत:ला IAS सांगून तिच्यासोबत लग्न केलं. सोबतच तिने धमकीही दिली की, ती पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल करेल. ही धमकी देऊन पत्नीने पतीचा पासपोर्ट, पासबुक आणि कागदपत्रे जमा केले. आता महिला तरूणाला १० लाख रूपये मागत आहे. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी महिलासहीत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार नवीन गुप्ता वडोदऱ्याचा राहणारा आहे. त्याची फेसबुकवर भोपाळच्या राणी रॅकवारसोबत मैत्री झाली. २०१८ मध्ये दोघांची मैत्री प्रेमात बदलली. आरोप आहे की, राणीने नवीनला सांगितलं की, ती सिंगर आहे आणि भोपाळच्या जेके हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. नवीनला विश्वासात घेतल्यावर महिलेने तिच्या कुटुंबियांसोबत त्याचं बोलणं करून दिलं. कुटुंबियांच्या सहमतीने दोघांचा साखरपुडा झाला आणि ६ जून २०१९ ला भोपाळमध्ये त्यांचं लग्न झालं. तरूणानुसार, त्याने राणीला ८.५ लाख रूपयांच्या वस्तू दिल्या. ज्यात दागिनेही होते. तरूणाने पत्नीच्या अकाउंटमध्ये पैसेही जमा केले.

याप्रकरणी तरूणाच्या कुटुंबियांनी सांगितलं की, सगळं काही ठीक सुरू होतं. पण २३ जूनला परिवाराला धक्का बसला. महिलेने तिच्या मित्रांना सांगून पती विरोधात जयपूरमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस आले आणि नवीनला घेऊन गेले. तो साधारण तीन महिने तुरूंगात होता. यादरम्यान पत्नी त्याला एका मुलीला घेऊन तुरूंगात भेटायला येत राहिली. ही मुलगी तिच होती जी तिने सांगितली होती की, ती तिच्या बहिणीची मुलगी आहे.

यादरम्यान परिवाराने कसंतरी नवीनला तुरूंगातून बाहेर काढलं. तुरूंगातून बाहेर आल्यावर नवीनने पत्नीचा शोध घेतला तर त्याला समजलं की, राणी आधीच विवाहित आहे आणि तिला एक मुलगीही आहे. त्याला हेही सांगण्यात आलं होतं की, राणीच्या आई-वडिलांचा मृत्यू एका कार अपघातात झाला होता. लग्नावेळी राणीने जे शपथपत्र दिलं होतं त्यात तिने ती अविवाहित असल्याचं सांगितलं होतं. नंतर समजलं की, तिचं लग्न ६ वर्षाआधी प्रेम सिंह दांगी नावाच्या व्यक्तीसोबत झालं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी