शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या नावावर तरूणीसोबत रेप, रात्रभर म्हणत राहिला - लग्न होणार, सकाळी मुंबईला झाला पसार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 11:18 IST

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मॅट्रोमोनिअल साइटवर मुंबईच्या मालाडमध्ये राहणारा बिझनेसमन इस्माइल सैय्यदसोबत मैत्री झाली. त्याने प्रोफाइलमध्ये त्याचं वय ३५ सांगितलं होतं.

भोपाळमधून बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅट्रोमोनिअल साइटवर ओळख झाल्यावर मुंबईतील ५० वर्षीय व्यक्तीने त्याचं वय ३५ असल्याचं सांगितलं आणि निकाहच्या नावावर तरूणीसोबत बलात्कार केला. तरूणीने ९ महिन्यांनंतर पोलिसात याबाबत तक्रार दिली. आता पोलीस आरोपीला पकडण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहे.

तक्रारीत तरूणीने सांगितलं की, तिचं वय ३१ वर्षे आहे आणि ती विदिशामध्ये नोकरी करते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मॅट्रोमोनिअल साइटवर मुंबईच्या मालाडमध्ये राहणारा बिझनेसमन इस्माइल सैय्यदसोबत मैत्री झाली. त्याने प्रोफाइलमध्ये त्याचं वय ३५ सांगितलं होतं. तरूणीने सांगितलं की, काही दिवसातच दोघांचं निकाह ठरला. १५ सप्टेंबरला निकाह करण्याचं ठरलं होतं. (हे पण वाचा : अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अश्लील व्हिडीओ दाखवत होती तरूणी, अनेकदा ठेवले समलैंगिक संबंध)

तरूणीने सांगितलं की, माझा होणारा पती इस्माइल १५ सप्टेंबरला मुंबईहून भोपाळला आला होता. त्याच्या बोलवण्यावरून मी एका हॉटेलमध्ये गेले होते. जेव्हा मी त्याला निकाहबाबत विचारले तर तो सतत सांगत राहिला की, काझी इथेच येणार आहे. काझीची वाट बघता बघता रात्र झाली. तो मला म्हणाला आता फार रात्र झाली आहे तू इथेच थांब. 

तरूणीनुसार, आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवेल आणि लग्न न करताच मुंबईला निघून गेला. तो मुंबईला गेल्यावर तिला समजलं की त्याचं वय ३५ नाही तर ५० वर्षे आहे. तरी सुद्धा तरूणी त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार होती. मात्र, इस्माइलने लग्नास नकार दिला. तरूणीने सांगितलं की, ती गेल्या ९ महिन्यांपासून त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावत आहे. पण तो तयार नाही. अखेर वैतागून तिने पोलिसात त्याच्या विरोधात तक्रार दिली.

कोहेफिजा पोलीस स्टेशनचे टीआय अनिल वाजपेयी याप्रकरणी म्हणाले की, तरूणीची तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे. तक्रारीनुसार, आरोपी विरोधात छेडछाड, धमकी देणे आणि जबरदस्ती करण्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आरोपीचा मुंबईचा पत्ता लागला आहे. लवकरच एक टीम आरोपीला अटक करण्यासाठी जाईल. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी