शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

CRPF जवानाने पत्नीवर गोळ्या झाडल्या; पोलिसांना कॉल केला, त्यानंतर स्वत:ही केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:50 IST

सध्या पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका सीआरपीएफ जवानाने आपल्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर याबाबत पोलिसांना फोन करून माहिती दिली आणि स्वतः देखिल जवानाने आत्महत्या केली. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल आहेत. सध्या पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १.३० च्या सुमारास मिसरोड पोलिस स्टेशन परिसरातील बांगरासिया येथे ही घटना घडली. सीआरपीएफ जवान रविकांत वर्मा यांनी आपल्या पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या. यानंतर, त्यांनी स्वत: पोलीस नियंत्रण कक्ष आणि डायल १०० वर कॉल केला आणि सांगितले की, पत्नीची हत्या केली आहे. यानंतर त्यांनी स्वतःलाही गोळ्या झाडून संपविले.

घटनेच्या वेळी सीआरपीएफ जवान रविकांत हे दारूच्या नशेत होते. दारू पिण्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यानंतर सीआरपीएफ जवान रविकांत यांनी हे भयानक पाऊल उचलले, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ज्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी त्यांना घरात रक्ताने माखलेले मृतदेह पडलेले दिसले. यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच, खून आणि आत्महत्येचा तपास सुरू केला आहे.

दोघांमध्ये वारंवार वादसीआरपीएफ जवान रविकांत वर्मा आणि त्यांची पत्नी रेणू वर्मा हे मूळचे भिंडचे रहिवासी होते. ते भोपाळमधील सीआरपीएफ कॅम्पजवळील सिव्हिल कॉलनीत राहत होते. रविकांत आणि रेणू यांनाही दोन मुलेही आहेत. ६ वर्षांचा मुलगा आणि २.५ वर्षांची मुलगी आहे. घटनेच्या वेळी दोन्ही मुले घरातील दुसऱ्या खोलीत होती. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारीही घरात पोहोचले. दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी