शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

"त्याने मला आत्महत्या अन् गर्भपात करण्यास भाग पाडलं"; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 12:21 IST

Pawan Singh : पवन सिंहची पत्नी ज्योती सिंहने अभिनेत्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्योतीने पवनवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहच्या (Pawan Singh) अडचणीत आता वाढ झाली आहे. पवन सिंहची पत्नी ज्योती सिंहने अभिनेत्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्योतीने पवनवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. पवन सिंहने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले आणि त्याचवेळी तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा दावा ज्योती सिंहने केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

बलिया पोलीस स्टेशनचे इन्चार्ज इन्स्पेक्टर प्रवीण कुमार सिंह यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. ते सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे, पवन सिंह कॉललाही उत्तर देत नाही. पोलीस तक्रारीत ज्योती सिंहने म्हटले आहे की, '2018 मध्ये त्यांच्या लग्नानंतर लगेचच पवन सिंहची आई आणि बहिणीने ज्योतीला तिच्या लूकवरून टोमणे मारायला सुरुवात केली. पवन सिंहच्या आईनेही माहेरच्यांकडून 50 लाख रुपये हडप केले होते. 

तक्रारीनुसार, पवन सिंहची आई ज्योतीला रोजच शिवीगाळ करत असे. गरोदरपणात पवन सिंहच्या कुटुंबीयांनी तिला अशी औषधे दिली होती, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला.' ज्योतीने पुढे सांगितले की, पवन सिंह आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा मानसिक छळ करण्यासोबतच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. ज्योतीच्या अर्जावर पवन सिंहला 5 नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.

पवनने ज्योतीकडे मर्सिडीजची देखील मागणी केली होती. तिने गंभीर आरोप केले असून तिच्याकडे यासंबंधी सर्व पुरावे देखील आहेत. पवन सिंह हा भोजपुरी चित्रपटातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. आपल्य़ा अभिनयासोबतच तो नेहमी पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. त्याच्या पहिल्या पत्नीने सुसाईड केलं असून ज्योती त्याची दुसरी पत्नी आहे. पण आता ज्योतीने गंभीर आरोप केल्यामुळे तो वादात सापडला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी