शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

भिवंडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार करणारे दोघे अटकेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 01:49 IST

भिवंडी परिसरात अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचाराच्या घटनांची मालिकाच सुरू आहे.

भिवंडी : भिवंडी परिसरात अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचाराच्या घटनांची मालिकाच सुरू आहे. मंगळवारी उघडकीस आलेल्या घटनेत, कुरेशीनगर, कसाईवाडा येथे ३१ वर्षीय तरु णीवर तीन महिन्यांपूर्वी दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.सादीन अन्सारी आणि खालीद अन्सारी ही आरोपींची नावे आहेत. कुरेशीनगरमधील राधाबाई बिल्डिंगमध्ये पीडित तरु णी ही तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. आरोपीदेखील याच इमारतीत राहत असून, त्याच्या घराशेजारी पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या मालकीची आणखी एक खोली आहे. या खोलीतील बाथरूममध्ये पीडित तरु णी अंघोळीसाठी गेली होती. अंघोळ आटोपून ती बाथरूममधून बाहेर पडत असताना, सादीन आणि खालीद यांनी तिला बळजबरीने उचलून पुन्हा बाथरूममध्ये नेले. तिथे आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडली. मात्र, या मुलीमध्ये झालेले बदल आईच्या लक्षात आले. तिने विश्वासात घेऊन मुलीची चौकशी केली असता, तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे भयभीत झालेल्या आईने मुलीला निजामपूर पोलीस ठाण्यात नेऊन सादीन व खालीद या दोघांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर इंदलकर यांनी दोघांना अटक केली. बुधवारी ठाणे न्यायालयाने त्यांना ३0 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी