शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पट्टेरी वाघाची कातडी, पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी केली अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 18:28 IST

Smuggling tiger skin and paws : या चौघांनाही बुधवारी न्यायालयात हजार केले असता त्यांना २५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात वन्यजिव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९(३), ४४, ४८(अ), ४९(बी), ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करून लाखो रुपये किंमतीचे पट्टेरी वाघाचे सोलुन काढलेले, कडक झालेले व सुकलेले काळया व पिवळया पट्टे असलेले कातडे व पाच नखे असलेला पंजा असा म

नितिन पंडीत 

भिवंडीः राष्ट्रीय वन्यजीव प्राणी असलेल्या पट्टेरी वाघाची कातडी व पंज्याची तस्करी करणाऱ्या चौकडीला कोनगाव पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या तस्करांकडून लाखोंचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. प्रशांत सुशीलकुमार सिंग (वय २१, राहणार वडाळा पूर्व, मुंबई), चेतन मंजे गौडा (वय २३, रा. वडाळा, मुंबई), आर्यन मिलिंद कदम (वय २३, रा. वडाळा पूर्व, मुंबई), अनिकेत अच्युत कदम (वय २५, रा. सायन कोळीवाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावं आहे. या चौघांनाही बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भिवंडी तालुक्यातील नाशिक मुंबई बायपास महामार्गावर ठाकुरपाडा गावाच्या हद्दीतील बासुरी हॉटेलचे समोर काही तस्कर पट्टेरी वाघ या वन्यजीव प्राण्याचे कातडे व पंजा विक्री करणेकरिता येणार असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी वन विभागाचे कर्मचारी व वॉर रेस्क्यू फाउंडेशनचे वन्यजीव अभ्यासक सुहास पवार व योगेश कांबळे यांच्यासह सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. 

या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९(३), ४४, ४८(अ), ४९ (बी), ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करून लाखो रुपये किंमतीचे पट्टेरी वाघाचे सोलून काढलेले, कडक झालेले व सुकलेले काळ्या व पिवळ्या पट्टे असलेले कातडे व पाच नखे असलेला पंजा असा मुद्देमाल कोनगाव पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान, हा मुद्देमाल या चारही आरोपींनी कुठून आणला, तो कुणाला विकण्यासाठी चालविला होता, याचा तपास पोलिसांनी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक पराग भाट, सहा. पोलीस उप निरीक्षक वामन सूर्यवंशी, पोलीस हवालदार राजेश शिंदे, संतोष मोरे, पो. ना विनायक मासरे, संतोष पवार, अविनाश पाटील, अशोक ढवळे, कृष्णा महाले व गणेश चोरगे या पोलीस पथकाने तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करत आहेत. 

टॅग्स :Arrestअटकforest departmentवनविभागPoliceपोलिसbhiwandiभिवंडी