शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी गुन्हे शाखेकडुन जिलेटीन स्फोटके विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 23:30 IST

भिवंडीत जिलेटीन व डिटोनेटर विक्रीसाठी आलेल्या तिघांना नदीनाका परिसरात सापळा लावून भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली आहे.

नितिन पंडीत

भिवंडी: भिवंडीत जिलेटीन व डिटोनेटर विक्रीसाठी आलेल्या तिघांना नदीनाका परिसरात सापळा लावून भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली आहे. या तिघांकडून २० हजार रुपये किंमतीच्या जिलेटीनचे ५ बॉक्समध्ये साठवलेले  एकुण १००० नग तर २५ हजार रुपये किंमतीचे १००० नग डीटोनेटर सह चार लाख रुपये किंमतीची  मारूती इको कार असा एकुण रू. ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त करून तिघा आरोपींना अटक केली आहे.

एका मारूती इको कार मधुन प्रतिबंधीत जिलेटीन व डीटोनेटर हे विक्री करणेकरीता येणार असल्याची खबर भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली असता मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान नदीनाका पोलीस चौकी समोर सापळा लावला असता एक मारूती इको कार क्रमांक एमएच ०४ एफझेड ९२०० या कारला थांबवुन गाडीत असलेले अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील ( वय ३४ वर्ष, राहणार आपटी खुर्द, ता. विक्रमगड, पालघर ) पंकज अच्छेलाल चौहान ( वय २३ वर्ष, राहणार विक्रमगड, ) व समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा ( वय २७ वर्ष, राहणार वेडगेपाडा, ता. विक्रमगड ), यांना ताब्यात घेऊन गाडीची पाहणी केली असता गाडीत २० हजार रुपये किंमतीच्या जिलेटीनचे ५ बॉक्समध्ये साठवलेले  एकुण १००० नग तर २५ हजार रुपये किंमतीचे १००० नग डीटोनेटर सह चार लाख रुपये किंमतीची  मारूती इको कार असा एकुण रू. ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त करून तिघांना अटक केली आहे.

हे तिघेही हि स्फोटके  चोरीने विक्रीस घेवुन जात असतांना जप्त करण्यात आली असून बॉम्ब शोधक व नाशक पथक, ठाणे यांचे मदतीने तपासणी करुन हि स्फोटके पंचनामा करून सुरक्षीत रित्या जप्त करण्यात आली आहेत. हि स्फोटके देखील आरोपींनी चोरी करून आणली असून ती विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी स्थानिक निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, भिवंडी युनिट- २ च्या पथकाने केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhiwandiभिवंडी