शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बीड सरपंच हत्याकांडाचे भिवंडी कनेक्शन समोर; मित्राच्या घरी आले होते आरोपी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 23:31 IST

आरोपी सुदर्शन घुले इतर दोन आरोपी आसऱ्यासाठी आले होते भिवंडीत 

नितीन पंडित

भिवंडी - बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींचे भिवंडी कनेक्शन समोर आले आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले त्याच्या इतर दोन साथीदारांसह तिघेही हत्याकांडानंतर ११ डिसेंबरला भिवंडीत आपल्या ओळखीच्या मित्राकडे राहायला आला होते. मात्र भिवंडीत आसरा मिळाला नसल्याने त्याच दिवशी तिघेही आरोपी भिवंडीतून गुजरातला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर तिन्ही मुख्य आरोपी ११ डिसेंबर रोजी भिवंडीतील समाजसेवक सोन्या पाटील यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर आरोपींनी बीड येथील त्यांच्या गावशेजारील व ओळखीचे भिवंडीत राहणारे विक्रम डोईफोडे यांची ओळख सांगितली. त्यांनतर सोन्या पाटील यांच्या कार्यालयातील व्यवक्तीने विक्रम डोईफोडे यांना आरोपी सुदर्शन घुले याचा फोटो विक्रम डोईफोडे यांना पाठवला मात्र ते वैष्णो देवी येथे देवदर्शनाला गेले होते. फोटो पाहून त्यांनी आरोपी सुदर्शन घुले यांना ओळखलं. देशमुख हत्येमध्ये घुलेचा समावेश असल्याच्या बातम्या समोर आल्याने विक्रम डोईफोडे यांनी त्यांना आसरा देण्यास नकार दिला.

यानंतर तीनही आरोपींनी त्यांच्या गावातील ओळखीचा तरुण रवी बारगजे याचा तपास काढला. रवी हा भिवंडीतील वळपाडा येथील विक्रम डोईफोडे यांच्याच बार आणि रेस्टोरेन्ट मध्ये काम करत असल्याने रवी यानेही विक्रम डोईफोडे यांना कॉल करून तीनही आरोपी बारवर आले असल्याची माहिती दिली मात्र विक्रम यांनी त्यांना राहण्यास देऊ नका असे सांगितल्याने तीनही आरोपी लघुशंकेचे नाव सांगून थेट तेथून पळून गेल्याची माहिती विक्रम डोईफोडे यांनी दिली आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारी