शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"मी आमदार बोलतोय...", आरोपीने फोन करून पोलिसांना धमकावले; त्यानंतर काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 18:06 IST

पोलिसांनी पकडलेल्या आपल्या साथीदारांची सुटका केली नाही म्हणून एका व्यक्तीने नकली आमदार बनून पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला धमकी दिली.

भटिंडा : सहसा बनावट अधिकाऱ्यांकडून फसवणूक आणि लोकांची दिशाभूल केल्याची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत असतात. मात्र, अशीच एक अनोखी घटना भटिंडा येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी पकडलेल्या आपल्या साथीदारांची सुटका केली नाही म्हणून एका व्यक्तीने नकली आमदार बनून पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला धमकी दिली. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला संशय आल्याने त्यांनी खऱ्या आमदाराला फोन करून या प्रकरणाची चौकशी केली. 

त्यावेळी समजले की, आमदारांनी पोलीस ठाण्यात फोन केला नाही आणि ते भटिंडामध्येही उपस्थित नव्हते. पोलिसांचा संशय खरा ठरल्यानंतर नकली आमदार म्हणून फोन करणारा आरोपी हरविंदर सिंग निवासी कोठे, बाबा जीवनसिंग दान सिंग वाला यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध नेहियानवाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हरविंदर सिंग याने स्वतःला भुच्चो हलकाचे आमदार मास्टर जगसीर सिंग असल्याचे फोन करून पोलिसांना धमकी दिल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोनियाना पोलीस चौकीच्या पोलीस पथकाने 19 डिसेंबर रोजी लुटमारीच्या आरोपाखाली तीन तरुणांना अटक केली होती. आरोपी हरविंदर सिंग हा तिन्ही तरुणांना सोडवण्यासाठी चौकी प्रभारी उपनिरीक्षक मोहनदीप सिंग बांगी यांच्याकडे आला, जो स्वत:ला आम आदमी पार्टीचा महासचिव असल्याचे सांगत होता. मात्र, चौकी प्रभारीने पकडलेल्या तरुणांना कलम 109 अन्वये तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा जामीन एसडीएमकडून मिळवावा लागत होता.

आरोपी हरविंदर सिंगने त्याच्या तीन साथीदारांना जामीन मिळाल्यानंतर 23 डिसेंबर रोजी उपनिरीक्षक मोहनदीप सिंग यांना फोन केला आणि भुच्चो हलकाचे आमदार मास्टर जगसीर सिंग तुमच्यासोबत बोलतील असे सांगितले. यावेळी त्याने स्वत: आमदार असल्याचे दाखवून उपनिरीक्षकांशी फोनवर बोलून अटक केलेल्या साथीदाराना का सोडणे नाही? असा जाब विचारत धमकी दिली.

खऱ्या आमदारांनाही आश्चर्य वाटलेसीआयए स्टाफमध्ये बराच काळ काम केलेले पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहनदीपसिंग बांगी यांना या फोनवर संशय आला की, कोणताही आमदार पोलीस अधिकाऱ्याशी या टोनमध्ये फोनवर बोलत नाही. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता आमदार चंदीगडहून पटना साहिबला विमानाने गेल्याचे समजले. याशिवाय, खऱ्या आमदारांसोबत याबाबत चर्चाही केली. त्यांनी स्वत: काहीही असं बोलले नसल्याचे सांगत आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी हरविंदर सिंगविरुद्ध नेहियानवाला पोलीस ठाण्यात बनावट आमदार म्हणून पोलीस कर्मचाऱ्याला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी