शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी DSP, मग भीती कशाची? रिकामटेकड्या पतीला रातोरात बनवले IPS; PMO तही उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 20:14 IST

Reshu Krishna husband Roshan krishna IPS controversy: एसडीपीओ रेशू कृष्णा यांचा पती आयपीएसच्या वर्दीमध्ये आहे. रेशू यांनी आपल्या पतीसोबत जो फोटो शेअर केला त्यात पतीने आयपीएसची वर्दी घातलेली आहे. खांद्यावरील बॅजवर आयपीएस लिहिलेले आहे, डोक्यावर टोपी आहे. दोघांनी पोलिसांच्या कारमध्ये फोटो काढत व्हिक्ट्री साईन दाखवलेली आहे. 

भागलपूर: देशाला राजकारणी जावयांची व्याख्या माहिती असेल. महिला आरक्षणामुळे घरातील महिलेला किंवा पत्नीला निवडणुकीत उभे करायचे आणि सारा कारभार आपणच हाताळायचा हे अनेक ठिकाणी होत आहे. पतीराज अगदी ग्राम पंचायतीपासून ते पार आमदारकी, खासदारकीपर्यंत होते. परंतू बिहारमध्ये एक एसा प्रकार घडला आहे की, त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने (PMO) घेतली आहे. (bhagalpur sdpo kahalgaon reshu krishna made her husband Roshan krishna as IPS uniform photo viral in victory sign on social media)

कहलगावच्या एसडीपीओ (Sub Divisional Police Officer) रेशू कृष्णाने (reshu krishna) आपल्या पतीला रातोरात आयपीएस अधिकारी बनविले. एसडीपीओला बिहारमध्ये आधी डीएसपी (DSP) संबोधले जायचे. या दोघा नवरा-बायकोने फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि अख्ख्या पोलीस दलात खळबळ उडाली. कोणीतरी याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाला (Prime Minister's Office) केली. 

एसडीपीओ रेशू कृष्णा यांचा पती आयपीएसच्या वर्दीमध्ये आहे. महत्वाचे म्हणजे हा पती काहीच कामधंदा करत नाही. रेशू यांनी आपल्या पतीसोबत जो फोटो शेअर केला त्यात पतीने आयपीएसची वर्दी घातलेली आहे. खांद्यावरील बॅजवर आयपीएस लिहिलेले आहे, डोक्यावर टोपी आहे. दोघांनी पोलिसांच्या कारमध्ये फोटो काढत व्हिक्ट्री साईन दाखवलेली आहे. 

रेशू कृष्णा यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पीएमओकडे झालेल्या तक्रारीत रेशू यांचा पती काहीही काम करत नाही. मग त्यांना आयपीएसची वर्दी कशी काय दिली? असा सवाल करण्यात आला आहे. रेशू या स्वत: सांगत फिरतात की त्यांचा पती आयपीएस आहे आणि पीएमओमध्ये काम करतात. अशा प्रकारची तक्रार आल्यावर पीएमओने गंभीरतेने घेतले आणि ही तक्रार बिहार पोलीस मुख्यालयाला पाठवून दिला. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. 

बिहार मुख्यालयाने यावर चौकशी लावली असून रेशू यांचा पती आयपीएस अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. आता त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. चौकशीचा ससेमिरा मागे लागताच, रेशू आणि त्यांच्या पतीने सोशल मीडियावरून त्यांचा फोटो डिलीट केला आहे. मात्र, त्या आधीच हा फोटो व्हायरल झाला होता. सामान्य लोकांना ही वर्दी घालण्याची परवानगी नाही. असे केल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाची कारवाई केली जाते. तर आयपीसीच्या कलम 140 नुसार तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा आहे.  

टॅग्स :Policeपोलिसprime ministerपंतप्रधानBiharबिहार