शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 19:32 IST

अतुलची आई विमानतळावर रडत असताना बेशुद्ध पडली. माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं गेलं. माझा म्हातारपणीचा आधार गेला असं म्हटलं आहे. 

बंगळुरूमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणारा एआय इंजिनिअर अतुल सुभाष याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. बुधवारी संध्याकाळी त्याचे आई-वडील आणि भाऊ त्याच्या अस्थी घेऊन पाटणा विमानतळावर पोहोचले. तिथे अतुलच्या पालकांनी आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे. अतुलची आई विमानतळावर रडत असताना बेशुद्ध पडली. माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं गेलं. माझा म्हातारपणीचा आधार गेला असं म्हटलं आहे. 

अतुल सुभाषचे वडील म्हणाले, "आपली न्याय व्यवस्था खूपच कमकुवत आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही. माझ्या मुलाने सर्वकाही सांगितलं आहे. त्याने आम्हाला फार काही सांगितलं नाही. हे सर्व ऐकून आम्ही दु:खी होऊ असं त्याला वाटलं. त्याचा खूप छळ झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था योग्य असावी अशी आमची इच्छा आहे. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे.'' 

अतुलचा धाकटा भाऊ विकास म्हणाला, सोमवारी २.५० वाजता मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्या व्यक्तीने विचारलं की मी माझा मोठा भाऊ अतुल सुभाष याच्याशी बोललो आहे का? मी रविवारी त्याच्याशी बोललो असल्याचं सांगितलं. रात्री बोलताना तो अगदी नॉर्मल होता.

विकास पुढे सांगतो, मी हा फोन कॉल एक प्रँक मानला. पण जेव्हा मी माझे व्हॉट्सॲप चेक केले तेव्हा मला माझ्या भावाचे अनेक मेसेज आले होते. तासाभरापूर्वी त्याने चार ईमेलही पाठवले होते. त्यात काही लोकांची नावं आणि संपर्कही देण्यात आले होते. मात्र, असं असूनही माझं व्हॉट्सॲप हॅक झालं असावं, असं मला वाटलं. यानंतर मी कॉलरला पुन्हा फोन केला तेव्हा मला कळालं की, तो सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन या पुरुषांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या एनजीओशी संबंधित आहे.

यानंतर एनजीओने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घरापर्यंत पोहोचले, पण दरवाजा तोडला नाही, कारण त्यांना वाटलं की, कदाचित अतुल घरी नसेल, कारण त्याची गाडी पार्किंगमध्ये नव्हती. पोलिसांनी सांगितलं की भावासोबत काहीतरी घटना घडली आहे. काही तासांनंतर जेव्हा विकास बंगळुरूला पोहोचला तेव्हा भावाने आत्महत्या केल्याचं आढळलं. घरात गेल्यावर भावाचा मृतदेह लटकलेला दिसला.

आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाषने २४ पानांची सुसाईड नोट आणि सुमारे १.५ तासांचा व्हिडीओ त्यांच्या लहान भावाच्या व्हॉट्सॲप नंबर आणि एका एनजीओच्या ग्रुपवर शेअर केला होता. न्याय मिळावा, असं लिहिलं होतं. तसं न झाल्यास त्याचे अस्थी न्यायालयासमोरील गटारात फेकून द्यावे. जेणेकरून त्याच्या आत्म्यालाही या व्यवस्थेकडून न्याय मिळाला नाही असं सतत वाटत राहिल असंही म्हटलं. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, अतुलने आपली सुसाईड नोट अनेकांना ईमेलद्वारे पाठवली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी