शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! प्रियकर का झाला राक्षस?; नोटमध्ये लिहिलं ५० तुकडे करण्यामागचं 'ते' रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 11:15 IST

महालक्ष्मी नावाच्या महिलेच्या हत्येने एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत आता नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत.

बंगळुरूमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेच्या हत्येने एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत आता नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी मुक्ती रंजन रॉय याने ओडिशातील भद्रक जिल्ह्यात गळफास लावून आत्महत्या केली. भद्रकचे पोलीस अधीक्षक वरुण गुंटुपल्ली यांनी सांगितलं की, आरोपी भुईनपूर गावचा रहिवासी होता आणि पोलिसांनी घटनास्थळावरून एक डायरीही जप्त केली आहे, ज्यामध्ये मुक्ती रंजनने महिलेच्या हत्येची कबुली दिली आहे.

मृतदेहाचे केले ५० पेक्षा जास्त तुकडे 

पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये मुक्ती रंजनने महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ५० पेक्षा जास्त तुकडे केल्याचं लिहिलं आहे. सुसाईड नोटचा संदर्भ देत बंगळुरू पोलिसांनी सांगितलं की, आरोपी मुक्ती रंजन आणि महालक्ष्मी यांच्यात प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी मुक्ती रंजनवर लग्नासाठी दबाव टाकत होती, त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती आणि त्यामुळेच आरोपीने तिची हत्या केली.

दोघांमध्ये वारंवार होत होती भांडणं

पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपी मुक्ती रंजन रॉयने लिहिलं आहे की, "मी महालक्ष्मीच्या वागण्याला कंटाळलो होतो. मी तिच्याशी वैयक्तिक कारणावरून भांडलो आणि हे भांडण रोज व्हायचं. महालक्ष्मीने माझ्यावर हल्ला केला, तिच्या या वागण्यामुळे रागावून महालक्ष्मीची हत्या केली." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ती रंजन रॉय यांनी सुसाईड नोट इंग्रजी आणि ओडिया भाषेत लिहिली होती. महालक्ष्मी मला किडनॅपिंग केसमध्ये अडकवण्याची धमकी देत ​​असे. मी खूप पैसे खर्च केले असंही त्याने म्हटलं आहे. 

कर्नाटक सरकारने बंगळुरू हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यासाठी आणि प्रकरणाची उकल करण्यासाठी एक पथक ओडिशात पाठवलं होतं. पोलिसांनी चार पथकं तिथे पाठवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वारंवार जागा बदलून पळून जात होता. बंगळुरूमधील मल्लेश्वरम भागातील एका इमारतीत महालक्ष्मीची हत्या करण्यात आली होती आणि तिच्या शरीराचे ५० हून अधिक तुकडे करण्यात आले होते, जे फ्रीजमधून जप्त करण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूर