शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बॉलिवुड नायिकेपेक्षाही सुंदर लेडी डॉन जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 13:32 IST

भन्नाट सुंदर दिसणारी आणि शस्त्रे नाचवत, भरधाव वेगात बाइक चालवत, बेफाम जीवन जगणारी अस्मिता गोहिल उर्फ बा. लेडी डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बा'ला पोलिसांनी अटक केली आहे.

बॉलिवुडमध्ये सर्वात हिट आणि हॉट मानल्या जाणाऱ्या कोणत्याही नायिकेपेक्षाही सुंदर मानली जाणारी अस्मिता गोहिल उर्फ बा अखेर जेरबंद झाली आहे. अस्मिताला महागड्या गाड्या चालवत शस्त्रांचे प्रदर्शन करत बेधडकपणे सोशल मीडियावर ते पोस्ट करण्याचाही शौक आहे. हातात तलावर घेऊन एकाच दिवशी सात ठिकाणी लुटमार केल्या, त्यापैकी एक सीसीटीव्ही क्लिप व्हायरल झाल्याने अखेर पोलिसांनी तिला अटक केली.

अस्मिता गोहिल उर्फ बा ही लेडी डॉन म्हणून ओळखली जाते. खरेतर अस्मिताचे वय फक्त २० वर्षे, मात्र तिला बा म्हटलेले आवडते. चांगले कपडे घालणे. बेफाम वागणे. गाडीही तशीच चालवणे. वेळच आली तर हातात शस्त्र घेऊन दहशत माजवणे. लूटमार करणे तिला आवडते असे म्हटले जाते. सुरतमध्ये काही भागांमध्ये तिची दहशत आहे. या लेडी डॉनचा तिच्या साथीदार मित्रासोबतचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. हा व्हिडिओ सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला होता. त्या व्हिडिओत अस्मिता बाइकवरुन आपल्या मित्रासोबत एका दुकानासमोरून वारंवार फेऱ्या मारताना दिसते. काही वेळानंतर ती दुकानासमोर येऊन थांबते. अस्मिता दुकानात जाताना दिसते. तेथे दुकानदाराला तलवारीचा धाक दाखवत पैसे लुटताना दिसते. त्यानंतर ती आणि तिचा साथीदार तेथून वेगाने निघून जातात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सुरत पोलिसांनी लेडी डॉनचा शोध सुरु केला. तिला परवा तिच्या साथीदारासह अटक करण्यात आली.

लेडी डॉनविरोधात अनेक गुन्हेअस्मिता गोहिलविरोधात नोंदवला गेलेला हा पहिला गुन्हा नाही. यापूर्वीही तिच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच तिच्या कारवायांचे व्हिडिओ याआदीही व्हायरल झाले आहेत. होळीच्या दरम्यान दोन गटांमध्ये दंगल झाली होती. त्यात अस्मिता ऑपल्या साथीदारांसह दुसऱ्या टोळीशी हाणामारी करताना दिसत होती. त्यातही ती शस्त्रांचा वापर करताना दिसली होती. त्यावेळीही तिला अटक झाली होती. मात्र सुटल्यानंतर तिने पुन्हा साथीदार जमवून कारवाया सुरु केल्या. 

शस्त्र आणि महागड्या बाइक्स हॉट फेवरेटलेडी डॉन अस्मिता गोहिलला महागड्या बाइक्स आवडतात. तसेच रिव्हॉल्व्हर बाळगणे, त्यासोबत फोटो काढणे  आणि ते फेसबुकवर अपलोड करुन लाइक मिळवणे तिला खूपच आवडते. फेसबुकवर तिचे सध्या १२हजार फॉलोअर आहेत, तर तिने २५०० जणांनाच फेसबुक फ्रेंड म्हणून स्वीकारले आहे. 

टॅग्स :lady donलेडी डॉनAsmita Gohil @ Baaअस्मिता गोहिल उर्फ बाSuratसूरत