शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

संपत्तीचा वादातून बॅटने मारहाण करत आईला संपवलं; रायगडच्या दरीत मृतदेह फेकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 05:55 IST

वीणा यांचा मोठा मुलगा अमेरिकेत स्थायिक असून त्या धाकटा मुलगा सचिन याच्यासोबत राहतात. मात्र त्यांच्यात संपत्तीवरून सतत वाद होत असून हे प्रकरण कोर्टात गेल्याचेही पोलिसांना समजले.

मुंबई : संपत्तीच्या वादात पोटच्या पोराने वृद्ध आईला बेसबॉल बॅटने मारहाण करत संपविले. त्यानंतर तिचा मृतदेह खोक्यामध्ये भरून नोकराच्या मदतीने रायगडच्या दरीत नेऊन फेकला. वीणा गोवर्धनदास कपूर (७४) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी त्यांचा धाकटा मुलगा सचिन कपूर आणि नोकर छोटू ऊर्फ लालकुमार मंडह यांना अटक केली आहे.

जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास जुहूच्या गुलमोहर रोड क्रमांक ५ येथील गरीबदास सोसायटीमध्ये (कल्पतरू सोसायटी) राहणाऱ्या वीणा या हरवल्या असल्याची तक्रार सिक्युरिटी सुपयवायझर म्हणून काम करणारे जावेद अब्दुला मापारी यांनी केली. त्यानुसार हरवल्याची तक्रार ७ डिसेंबर रोजी दाखल करत जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवार, उपनिरीक्षक नरवडे यांनी तपास सुरू करत घटनास्थळी धाव घेतली. 

चौकशीदरम्यान मापारी यांनी पोलिसांना सांगितले की, वीणा यांचा मोठा मुलगा अमेरिकेत स्थायिक असून त्या धाकटा मुलगा सचिन याच्यासोबत राहतात. मात्र त्यांच्यात संपत्तीवरून सतत वाद होत असून हे प्रकरण कोर्टात गेल्याचेही पोलिसांना समजले. तेव्हा संशय आल्याने पोलिसांनी वीणा व सचिन यांचे मोबाईल लोकेशन तपासले. तेव्हा वीणा यांचे जुहू तर सचिन याचे लोकेशन पनवेल दाखवले. त्यानंतर सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ७ डिसेंबरला सकाळी ७ वाजता सचिन आणि  छोटू ऊर्फ लालकुमार मंडह हे माउली इमारतीच्या फ्लॅट २०३ मध्ये आल्याचे आढळले. 

दोघांनाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले असता सचिनचे त्याची आई वीणा यांच्याशी संपत्तीच्या वादातून भांडण झाले आणि त्याने   हाताने व बेसबॉल बॅटने मारहाण करून त्यांची हत्या केल्याचे कबूल केले. तसेच नोकर छोटू याच्या मदतीने  पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वीणा यांचा मृतदेह एका मोठ्या खोक्यामध्ये भरून रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे दरीमध्ये फेकल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर भादंवि कलम ३०२, २०१, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मृतदेहाचा शोधवीणा कपूर यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक पवार आणि पथक यांना रवाना करण्यात आल्याचे वर्तक यांनी सांगितले.