शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रजा नाकारली म्हणून महावितरण कंपनीच्या अभियंत्याला लोखंडी रॉडने मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 15:55 IST

माझं कोण काही वाकडे करु शकत नाही, अशी दमदाटी करुन हातातील लोखंडी रॉडने शरीरावर लोखंडी रोडने मारहाण करुन गंभीर दुखापत केली आहे.

खेड : रजा देण्यास नाकारली म्हणून महावितरणच्या कनिष्ठ अभियंता यांना लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. याबाबत महावितरणमधील वरिष्ठ यंत्रचालक बाळकृष्ण नागु पालेकर (रा. वाडा ता. खेड ) यांच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर सदाशिव बोरचटे (वय ३३ )  रा.पडाळवाडी ( ता.खेड ) यांनी फिर्याद दिली आहे.ही घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मौजे वाडा (ता.खेड) गावच्या हद्दीत महावितरण कार्यालयात ही घटना घडली आहे.वाडा येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ यंत्रचालक बाळकृष्ण नागु पालेकर यांनी कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर बोरचटे यांच्या कार्यालयात जाउन मला घरगुती अडचण असल्यामुळे मला दहा दिवसांची रजा पाहिजे अशी विचारणा बोरचटे यांना केली. याबाबत कनिष्ठ अभियंता बोरचटे यांनी पालेकर यांना सांगितले की, आपले कार्यालय ग्रामीण भागात असून पावसाळी दिवस आहेत. तसेच तुमच्या सुट्टीच्या दिवसात गणपती उत्सव आहे. तुमच्या अगोदरच शनिवारी दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी रजेचा अर्ज दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या अगोदर तुमची रजा मंजूर करता येणार नाही. तरीपण मी तुमच्या रजेचा अर्ज वरिष्ठांना देतो, असे म्हणल्या कारणांवरुन पालेकर यांनी ऑफिसमधील एक लोखंडी रॉड हातात घेवुन बोरचटे यांच्याजवळ जाऊन तुच माझी जाणुन बुजुन रजा मंजुर करत नाही, माझं कोण काही वाकडे करु शकत नाही, अशी दमदाटी करुन हातातील लोखंडी रॉडने शरीरावर मारहाण करुन गंभीर दुखापत केली आहे. याबाबत कनिष्ठ अभियंता बोरचाटे यांनी खेड पोलीस ठाण्यात पालेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील पोलीस हवालदार एल. गिजरे करीत आहे.

टॅग्स :Khedखेडmahavitaranमहावितरण