शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! नराधमांनी बाईक रोखली, जबरदस्तीनं गाडीत बसवलं; पतीसमोरच पत्नीवर गँगरेप केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 12:27 IST

मात्र तिथे असणाऱ्या तिघांनी पती-पत्नीला पकडून ठेवलं. तिघांनी पतीला बेदम मारहाण करत दोघांना गाडीत बसवलं आणि एका निर्जनस्थळी घेऊन गेले.

ठळक मुद्देया दोघांनी आम्हाला सोडून द्या असं वारंवार विनवणी केली परंतु तिघा नराधमांना कुठलीही दया आली नाही. टोल नाका क्रॉस केल्यानंतर एका इको गाडीत बसलेल्या ४ नराधमांनी दाम्पत्याची बाईक थांबवली.घटनेचं गांभीर्य लक्षात घेता बाडमेर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ घटनेच्या तपासासाठी एक पथक तयार केले

बाडमेर – राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात लाजिरवाणी घटना घडली आहे. याठिकाणी ३ जणांच्या टोळक्यांनी पतीसमोरच त्याच्या पत्नीवर गँगरेप केला आहे. पती-पत्नी बाईकवरुन बालोतरा ते सरणू मार्गे बाडमेरला जात होते. त्यावेळी सरणू टोलच्या पुढे गेल्यावर गाडीत बसलेल्या ४ टोळक्यांनी पती-पत्नीची बाईक थांबवली. एकानं पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली अन् बाईक घेऊन पसार झाला.

मात्र तिथे असणाऱ्या तिघांनी पती-पत्नीला पकडून ठेवलं. तिघांनी पतीला बेदम मारहाण करत दोघांना गाडीत बसवलं आणि एका निर्जनस्थळी घेऊन गेले. त्यानंतर पतीसमोरच तिघांनी त्याच्या पत्नीवर एका मागोमाग एक असं करत सामूहिक बलात्कार केला. या दोघांनी आम्हाला सोडून द्या असं वारंवार विनवणी केली परंतु तिघा नराधमांना कुठलीही दया आली नाही. पोलिसांनी सध्या या तिघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा आणखी तपास केला जात आहे.

या प्रकरणाबाबत पोलीस उपअधीक्षक शुभकरण म्हणाले की, मंगळवारी पती पत्नी बाईकवर बसून बाडमेरला जात होते. त्यावेळी टोल नाका क्रॉस केल्यानंतर एका इको गाडीत बसलेल्या ४ नराधमांनी दाम्पत्याची बाईक थांबवली. सुरुवातीला पत्नीसमोरच पतीचा बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोघांना इको गाडीत बसवून निर्जनस्थळी नेले. याठिकाणी पतीसमोर तिघांनी महिलेवर गँगरेप केला. त्यानंतर या दोघांनाही टोल प्लाझापासून काही अंतरावर गाडीतून फेकण्यात आले. गंभीर अवस्थेत असणाऱ्या या दोघांना स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस आणखी तपास करत आहेत.

पती-पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू

घटनेचं गांभीर्य लक्षात घेता बाडमेर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ घटनेच्या तपासासाठी एक पथक तयार केले. त्यानंतर आरोपींच्या शोधात असलेल्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींची चौकशी सुरू आहे. गँगरेपनंतर महिलेचे तब्येत खूप खराब झाली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गँगरेपचा गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. तर एका आरोपीचा अद्यापही शोध सुरू असल्याचं पोलीस म्हणाले.

टॅग्स :Policeपोलिस