शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचा तगादा लावल्याने बारबालेची हत्या; मृतदेहाच्या चपलेवरून लावला आरोपीचा सुगावा

By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 21, 2022 18:53 IST

उर्वशी हिने लग्नाचा तगादा लावल्याने रियाज खान याने त्याचा मित्र इम्रान शेख याच्यासोबत मिळून तिच्या हत्येचा कट रचला होता.

नवी मुंबई : गाढी नदीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून तिच्या मारेकरूंचा शोध घेण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. मृत महिलेच्या चपलेवरून पोलिसांनी हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मृत महिला कोपर खैरणेची राहणारी आहे. 

माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धामणी गाव येथे गाढी नदीच्या पुलाखाली महिलेचा मृतदेह आढळून आला होता. १४ डिसेंबरला हा मृतदेह आढळून आल्यानंतर पनवेल तालुका पोलिस ठाण्यात त्याची नोंद करून तपासाला सुरवात करण्यात आली होती. दरम्यान या महिलेचा गळा आवळून हत्या करून मृतदेह त्याठिकाणी टाकण्यात आला होता. मात्र तिची ओळख पटेल असे काही पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते. 

गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी तपास पथक तयार केले होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड, उपनिरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, सुदाम पाटील, हवालदार प्रशांत काटकर, दीपक डोंगरे, रणजित पाटील आदींचा समावेश होता. यावेळी त्यांना मृत महिलेच्या पायातल्या चपलेवरून तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्या ब्रॅण्डची चप्पल विक्री होत असणाऱ्या दुकानांमध्ये चौकशी केली. यामध्ये वाशीतल्या दुकानातून ती चप्पल विकली गेलेली असल्याचे समोर आले. 

यानंतर, त्यावेळचे सीसीटीव्ही मिळवून तिच्यासोबत आलेल्या संशयित तरुणाचा शोध पोलिसांनी सुरु केला. यादरम्यान तो तरुण कोपर खैरणेतल्या एका जिममध्ये येत असल्याची माहिती हाती लागताच शनिवारी त्याला ताब्यात घेतण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रियाज खान असे त्याचे नाव असून तो देवनारचा राहणारा आहे.

रियाजचे शिरवणे येथील सोना बारमधील बारबाला उर्वशी सत्यनारायण वैष्णव (२७) हिच्याशी प्रेमसंबंध होते. उर्वशी हि कोपर खैरणेला रहायला होती, तर रियाज हा कोपर खैरणेतच जिममध्ये प्रशिक्षक आहे. उर्वशी हिने लग्नाचा तगादा लावल्याने रियाज खान याने त्याचा मित्र इम्रान शेख याच्यासोबत मिळून तिच्या हत्येचा कट रचला होता. त्यानुसार १४ डिसेंबरला तिला कारमध्ये बसवून गळा आवळून हत्या केल्यानंतर मृतदेह धामणी गावालगतच्या गाढी नदीत टाकला होता. 

हा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र उर्वशीच्या चप्पलच्या आधारे गुन्हे शाखेने संपूर्ण गुन्हा उघडकीस आणला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस