शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी प्रियकरासोबत पळून गेली होती, पोलिसांनी तिला शोधले, पण वडिलांनी केली तिची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 15:08 IST

या घटनेनंतर आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि घटनेची कबुली दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बंगळुरूमध्ये ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका व्यक्तीने आपल्याच मुलीची चाकूने वार करून हत्या केली आहे. दरम्यान, आरोपीच्या मुलगी त्याच्या इच्छेविरुद्ध एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि संधी पाहून तरुणासोबत पळून गेली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन आरोपीच्या ताब्यात दिले असता आरोपीने तिला घरी आणून तिची हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि घटनेची कबुली दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बंगळुरूच्या परप्पाना अग्रहारा येथील आहे. मूळचे म्हैसूरमधील एचडी कोटे येथील शेतकरी गणेश शरदम्मा याने स्वतःची मुलगी पल्लवीची हत्या केली. प्राथमिक तपासात पल्लवीचे एका मुलावर प्रेम होते, मात्र गणेश शरदम्मा तिचे नाते मान्य करण्यास तयार नव्हता. त्यामुळे  एके दिवशी पल्लवी तिच्या प्रियकरासह घरातून पळून गेली. याप्रकरणी गणेश शरदम्माने पोलिसांत फिर्याद दिली होती.

मुलगी अल्पवयीन असल्याने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला गणेश शरदम्माच्या ताब्यात दिले. आपल्या मुलीला पोलीस ठाण्यातून घेऊन गणेश शरदम्मा घरी पोहोचला. यानंतर घरी दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. दरम्यान, आरोपी गणेश शरदम्माने चाकूने मुलीवर जबर हल्ला केला. यामुळे पल्लवीचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपी गणेश शरदम्माने स्वतः पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्याने गुन्ह्याची कबुली देत ​​आपल्या मुलीची हत्या आपणच केल्याचे सांगितले. 

सध्या पोलिसांनी गणेश शरदम्माला अटक करून कारागृहात पाठवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश शरदम्माने त्याच्या मुलीवर हल्ला केला, तेव्हा त्याची पत्नी आणि इतर कुटुंबीयांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीचे रागाच्या भरात त्याच्या कुटुंबीयांवरही हल्ला केला. त्यामुळे गणेश शरदम्माची आई शारदम्मा आणि काका शांता कुमार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पल्लवीची काकी गीता यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी