शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

जास्तीच्या व्याजदराचे आमिष; एक कोटी ६८ लाखांची फसवणूक; गंगाखेड पोलीस ठाण्यात ४२ तक्रारदारांनी दिली फिर्याद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:10 IST

साधारण पंधरा दिवसांनी गंगाखेड येथे आज हा दुसरा गुन्हा नोंद झाला. नानलपेठच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक शाखेकडे वर्ग झाला आहे.

- प्रमोद साळवे 

गंगाखेड (जि.परभणी) : जास्तीच्या व्याजदराचे आमिष दाखवून राजस्थानी मल्टीस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी शाखा गंगाखेडच्या संचालक मंडळ व शाखा अधिकारी यांनी आपसात संगणमत करून कटकारस्थान रचून त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी गुंतवणूकदारांची गुंतवलेली रक्कम त्यांना परत न देता फसवणूक केली. याप्रकरणी ४२ तक्रारदारांनी शनिवारी रात्री गंगाखेड ठाण्यात फिर्याद दिली. यामध्ये एकूण एक कोटी ६८ लाख ७६ हजार ६५ रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे.

याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी हनुमान त्र्यंबकराव देशमुख यांनी फिर्याद दिली. यामध्ये एकूण ४२ गुंतवणूकदारांनी गुंतविलेल्या वेगवेगळ्या रकमेचा एकत्रित समावेश केला आहे. गंगाखेड शहरात डॉक्टर लेन भागात राजस्थानी मल्टीस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि.परळी वै.ची शाखा होती. या ठिकाणी विविध प्रकारच्या गुंतवणुकीवर १२ ते १३ टक्के व्याजदर देण्याचे नमूद केले होते. हा सर्व प्रकार १५ फेब्रुवारी २०२२ ते जानेवारी २०२४ मध्ये या गुंतवणूकदारांच्या बाबत घडला. आमच्या सोसायटीमध्ये पैसे जमा करा, ठेवींवर इतर बँकांपेक्षा आमच्याकडे जास्त व्याजदर आहे. मोठी रक्कम सोसायटीत ठेवली तर तुम्हाला दरमहा चांगल्या प्रमाणात व्याज मिळेल, असे आश्वासन शाखा व्यवस्थापक तसेच अन्य संचालक यांनी दिले होते. दरम्यानच्या काळात ४२ गुंतवणूकदारांनी येथे गुंतविलेल्या रकमेवर मुदत ठेवीचे काही व्याजही जमा झाले होते. मात्र, जानेवारी २०२४ पासून या शाखेला कुलूप लावण्यात आले. अनेक खातेदार येथे जाऊन बँक सुरू आहे का, परळी वैजनाथ येथील मुख्य शाखेकडे जाऊन चौकशी करीत होते. मात्र, सोसायटीचे सर्व संचालक मंडळ लोकांचे पैसे घेऊन फरार झाल्याचे समजले. याप्रकरणी एकूण ४२ तक्रारदारांनी गुंतविलेली एक कोटी ५८ लाख ७६ हजार ६५ रुपये आणि त्यावर व्याजासह एक कोटी ६८ लाख ७६ हजार ६५ रुपयांची गुंतवणूक करून संचालक मंडळ सोसायटीला कुलूप लावून फरार झाले. त्यामुळे सर्वांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकूण १४ आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली. या प्रकरणी सेवानिवृत्त कर्मचारी हनुमान देशमुख यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एकूण १४ जणविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२० ब, ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम तीन, चार अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा

अध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव प्रल्हाद अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय लड्डा, संचालक अशोक जाजू, सतीश सारडा, अजय पुजारी, संचालिका प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, नामदेव रोडे, कार्यकारी संचालक जगदीश बियाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी, गंगाखेडचे शाखाधिकारी उदावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

जिल्ह्यातील दुसरा गुन्हापरभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी वैजनाथच्या कच्छी बाजार येथील शाखेत ७६ लाखांच्या ठेवींची गुंतवणूक करणाऱ्या २१ खातेदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा ११ जूनला दाखल झाला आहे. साधारण पंधरा दिवसांनी गंगाखेड येथे आज हा दुसरा गुन्हा नोंद झाला. नानलपेठच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक शाखेकडे वर्ग झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी