लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर (खापरखेडा) : सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला शस्त्राचा धाक दाखवीत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. तिने रविवारी (दि. २३) बाळाला जन्म दिला असून, सोमवारी (दि. २४) तिचा व बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली. ही घटना खापरखेडा येथील इंदिरानगरात घडली.रूपेश ऊर्फ फाटा संतोष उईके (२०, रा. इंदिरानगर, आबादी, खापरखेडा, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने याच वस्तीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमजाळ्यात अडकविले. जीवे मारण्याची धमकी देत व शस्त्राचा धाक दाखवीत त्याने तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. हलाखीची परिस्थिती असल्याने तिच्या कुटुंबीयाला त्याचा प्रतिकार करणे शक्य झाले नाही.पोटात कळा उठायला सुरुवात झाल्याने तिला शुक्रवारी (दि. २१) नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती केले होते. तिने रविवारी बाळाला जन्म दिला असून, सोमवारी माता व बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्याने खापरखेडा पोलिसांनी भादंवि ३७६ (२) (एफ) (एन), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल केला. शिवाय आरोपी रूपेश यास हिवराबाजार (ता. रामटेक) परिसरातील जंगलातून ताब्यात घेत अटक केली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे करीत आहेत.
अल्पवयीन मातेसह बाळाचा मृत्यू: आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 22:22 IST
: सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला शस्त्राचा धाक दाखवीत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. तिने रविवारी (दि. २३) बाळाला जन्म दिला असून, सोमवारी (दि. २४) तिचा व बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अल्पवयीन मातेसह बाळाचा मृत्यू: आरोपीस अटक
ठळक मुद्देजीवे मारण्याची धमकी देत केला वारंवार अत्याचारनागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागातील क्रौर्य