शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Baba Siddique : "बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शर्ट बदललं आणि गर्दीत..."; आरोपी शिवाचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 11:32 IST

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवा याने उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँचला अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती दिली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवा याने उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँचला अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती दिली आहे. त्याने सांगितलं की तो आणि त्याचे साथीदार तीन दिवस बाबा सिद्दिकी यांची आणि आजुबाजूच्या परिसराची रेकी करत होते आणि दसऱ्याच्या दिवशी संधी मिळताच त्यांनी हत्या करण्याचा कट रचला.

शिवाने सांगितलं की, त्याला हत्येसाठी १० लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होते. हे आश्वासन त्याला लॉरेन्स बिश्नोई यांचा भाऊ अनमोल बिश्नोईने शुभम लोणकर याच्यामार्फत दिलं होतं. अनमोलने त्याला हत्येनंतर लाखो रुपयांसोबतच दर महिन्याला काही रक्कम देत राहीन असंही सांगितलं होतं. या संदर्भात शिवाने यासीन आणि शुभमने त्याला शस्त्र, मोबाईल आणि सिमकार्ड दिल्याचंही सांगितलं. 

आपला फोन फेकला आणि नवीन विकत घेतला

बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्यानंतर शिवकुमार गौतम हा शर्ट बदलून गर्दीत गायब झाला. त्याने घटनास्थळावरून कुर्ल्यापर्यंत ऑटो पकडली आणि तेथून ठाणे, नंतर पुण्यासाठी ट्रेन पकडली. जवळपास सात दिवस पुण्यात राहिल्यानंतर शिवाने झाशी आणि लखनौचा प्रवास केला. प्रवासादरम्यान त्याने आपला फोन फेकून दिला आणि नवीन फोन विकत घेतला.

हत्येनंतर नेपाळला पळून जाण्याचा होता प्लॅन

शिवाने असंही सांगितलं की, हत्येनंतर त्याचा प्लॅन उज्जैन आणि नंतर जम्मूतील वैष्णोदेवीला जाण्याचा होता. यानंतर तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता आणि त्यासाठी काही लोक त्याला मदत करत होते. शिवाला नेपाळला पाठवण्यात मदत करणाऱ्या आरोपींमध्ये अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंह यांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीMumbai policeमुंबई पोलीसCrime Newsगुन्हेगारी