शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Baba Siddique : ४५ जणांवर करडी नजर; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटरचं कसं सापडलं लोकेशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 13:09 IST

Baba Siddique And Shivkumar : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि त्याला आश्रय देणाऱ्या त्याच्या साथीदारांना बहराइचमधून अटक करण्यात आली.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा महाराष्ट्र पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी सातत्याने कारवाई सुरू आहे. हत्येनंतर फरार झालेला शिवकुमारलाही आता पोलिसांनी पकडलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि त्याला आश्रय देणाऱ्या त्याच्या साथीदारांना बहराइचमधून अटक करण्यात आली. यूपी एसटीएफसोबतच्या संयुक्त कारवाईत मुंबई पोलिसांना हे मोठं यश मिळालं आहे.

यूपी एसटीएफ आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अजित पवार गटाचे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी बहराइच जिल्ह्यातील नानपारा येथून वॉन्टेड शूटर शिवकुमार आणि अन्य ४ जणांना अटक केली आहे. शिवकुमारला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक तब्बल २१ दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. 

कसं सापडलं शिवकुमारचं लोकेशन?

शिवकुमारचे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या संपूर्ण डेटा मागवण्यात आला, ज्यामध्ये एकूण ४५ लोकांचा समावेश होता. या ४५ लोकांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात होती आणि हे लोक कुठे जातात, कोणाला भेटतात अशी त्यांची प्रत्येक हालचाल ट्रॅक केली होता. प्रकरणाचा तपास जसजसा पुढे गेला आणि लोकांना ट्रॅक केलं गेलं, तसतसा तपास ४ जणांवर येऊन थांबला, जे शिवकुमारच्या सतत संपर्कात होते.

बाबा सिद्दिकी यांच्यावर १२ ऑक्टोबरच्या रात्री बांद्रा येथील त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलें. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना विविध ठिकाणांवरून अटक करण्यात आली आहे. 

शिवकुमारला पकडण्यासाठी 'असा' रचला सापळा 

अटक करण्यात आलेल्या चार आरोपींवर पोलीस काही दिवसांपासून बारीक लक्ष ठेवून होते, त्यांचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं होतं. त्यानंतर गुन्हे शाखेला पुष्टी मिळाली की, हे चार लोक शिवकुमार गौतमला भेटतात आणि त्याच्या सतत संपर्कात आहेत. त्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून शिवकुमारला भेटण्यासाठी या चार जणांची १० तारखेपर्यंत वाट पाहिली. शिवकुमारने ज्या ठिकाणी सेफ हाऊस बांधले होते, त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता. शिवकुमार तेथे पोहोचताच गुन्हे शाखा आणि यूपी एसटीएफने त्याला आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे.  

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीस