शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

संकेतस्थळांवर राज्यभरातून दिवसाला सरासरी दोन तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:40 AM

सायबर गुन्ह्यांत वाढ होत असताना अनेक जण केवळ बदनामीच्या भीतीने तर, काही जण पोलीस ठाण्याच्या चकरा नको म्हणून तक्रारीसाठी पुढे येत नाहीत.

मनीषा म्हात्रे मुंबई : सायबर गुन्ह्यांत वाढ होत असताना अनेक जण केवळ बदनामीच्या भीतीने तर, काही जण पोलीस ठाण्याच्या चकरा नको म्हणून तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. मात्र, नागरिक अनभिज्ञ असल्याने राज्यभरातून दिवसाला २ किंवा ३ तक्रारी या संकेतस्थळावर येत आहेत.नागरिकांना तक्रारी करणे सोयीस्कर व्हावे म्हणून शासनासह, सायबर पोलिसांकडून तीन संकेतस्थळांबरोबर हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.केंद्र सरकारकडून २०१७मध्ये सायबर गुन्हे नोंद करण्यासाठी https://cybercrime.gov.in हे संकेतस्थळ सुरू झाले. सुरुवातीला ते केवळ महिला आणि बालकांच्या तक्रारींसाठी होते. आॅगस्ट २०१९पासून ते सर्वांसाठी खुले झाले. यात, आतापर्यंत अडीच हजारांच्या आसपास तक्रारी आल्या आहेत.जुलै २०१८ पासून www.reportphishing.in हे संकेतस्थळ महाराष्ट्र सायबर पोलिसांनीे सुरू केले. यात बँकिंग किंवा संवेदनशील वैयक्तिक माहिती विचारणारे कोणतेही फसवे संदेश, ईमेल, फोन कॉल्स प्राप्त झाल्यास तक्रार करता येईल. तसेच मोबाइल चोरी किंवा हरवल्यास मोबाइलचा आयएमईआय क्रमांक ब्लॉक करण्यासाठी  www.ceir.gov.in  या संकेतस्थळावर तक्रार करू शकतात. सायबर पोलीस फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करत आहेत. मात्र अजूनही नागरिक या संकेतस्थळापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे येत तक्रार करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.>घरबसल्या करू शकता तक्रारअनेकदा बदनामी, सायबर साक्षरतेच्या अभावामुळे तक्रारदार पुढे येत नाही. त्यामुळे गुन्हेगारही मोकाट राहतो. अशा वेळी सर्वांनीच सायबर सुरक्षेबाबत काळजी घ्यावी. त्यात, फसव्या कॉलबाबत समजताच, अथवा यात अडकले असल्याने घरबसल्याही संकेस्थळाच्या माध्यमातून आपण तक्रार नोंदवू शकता.- बलसिंग राजपूत, अधीक्षक, सायबर महाराष्ट्रआपल्या मोबाइलचा १५ अंकी आयएमईआय क्रमांक *#06# डायल करून नोंद करून ठेवा. जेणेकरून भविष्यात मोबाइल हरवल्यास याद्वारे त्याचा शोध घेण्यास मदत ठरू शकते. महिला आणि बालकांसाठी सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींकरिता हेल्पलाइन क्रमांक - १५५२६० हा आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम