मुंबई : गेल्या बुधवारी रिक्षा चालकाने एका महिलेसमोर अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिक्षा चालकाला शुक्रवारी रात्री अटक केली आहे. राजबहादूर पाल असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. गेल्या 22 तारखेला रात्रीच्या सुमारास मालाड येथून बोरिवलीला जाण्यासाठी पीडित महिलेने घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्यानंतर रिक्षा चालकाने अचानक रस्त्यामध्येच रिक्षा थांबवून चालकाने महिलेसमोर पँट काढून हस्तमैथून करण्यास सुरूवात केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने रिक्षातून पळ काढला.
महिलेसमोर अश्लील चाळे करणा-या रिक्षा चालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 08:33 IST