शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर असल्याची बतावणी करून सराफांना गंडा घालणाऱ्यास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 19:14 IST

पुन्हा अशाच प्रकारच्या फसवणुकीची घटना नौपाडा येथील एका हॉस्पिटलमध्ये घडली होती. अशा प्रकारे डॉक्टर असल्याची बतावणी करून गंडा घालणाऱ्या ठगास नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.  

ठळक मुद्देडॉक्टर असल्याची बतावणी करून गंडा घालणाऱ्या ठगास नौपाडा पोलिसांनी अटक केलीया टोळीचा मुख्यसूत्रधार मनीष शशिकांत आंबेकर (40, राहणार- पळस्पे गाव नवी मुंबई व नालासोपारा) यास 14 डिसेंबर रोजी अटक भामट्याकडून 1 लाख 20 हजाराची रोकड व 5 लाख 80 हजाराचे दागिने असा एकूण 7 लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला

ठाणे - नौपाड्यातील स्टेशन परिसरात एका सराफा दुकानात अज्ञात व्यक्तीने फोन करून मी डॉक्टर स्वाती बोलत असून मला सोन्याच्या पाटल्या बांगड्या खरेदी करायच्या आहेत, त्यासाठी माप घ्यायला माणसे पाठवा आणि सोबत काही सुट्टे पैसे देखील पाठवा अशी बतावणी करत 1 लाख रुपयांची फसवणूक केली होती. या घटनेस आठवडा उलटत नाही. तोच पुन्हा अशाच प्रकारच्या फसवणुकीची घटना नौपाडा येथील एका हॉस्पिटलमध्ये घडली होती. अशा प्रकारे डॉक्टर असल्याची बतावणी करून गंडा घालणाऱ्या ठगास नौपाडा पोलिसांनीअटक केली आहे.  

पाचपाखाडी येथील सोने विक्रीचा व्यवसाय करणारे मुकेश दहिवाळ (33) यांना 29 एप्रिल रोजी सायंकाळी लँडलाईनवर एक कॉल आला. फोनवर बोलणाऱ्या अज्ञात महिलेने मी आधार हॉस्पिटलमधून डॉ. स्वाती बोलत असून मला सोन्याच्या बांगड्या खरेदी करायच्या आहेत अशी बतावणी केली. याच वेळी या अज्ञात महिलेने माझ्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटांचे एक लाख रुपयांच्या नोटांचे बंडल दिले असून मला सुट्टे पैसे पाहिजे आहेत. तुमचा माणूस बांगड्यांचे माप घ्यायला येईल त्यावेळी त्याच्यासोबत सुट्टे पैसे देखील पाठवा असे देखील सांगितले. फोनवरून बोलणाऱ्या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुकेश दहिवाळ हे स्वतः 50 हजाराचे सुट्टे पैसे घेऊन आधार हॉस्पिटल येथे गेले असता संस्कार टॉवरजवळच्या लिफ्टनजीक एका अनोळखी इसमाने मुकेश यांना अडवून तुमच्याकडील रक्कम डॉक्टरांनी मला देण्यास सांगितली आहे, असे सांगून घेतली. रक्कम हातात मिळताच हा इसम फरार झाला. काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुकेश यांनी नौपाडा पोलिसात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. दरम्यान या दोन्ही घटनेतील चोरटे एकाच टोळीतील असावेत असा पोलिसांना संशय आहे, असा पोलिसांना संशय होता. तसेच अशाच प्रकारची फसवणूक कळव्यात देखील झाली होती. म्हणून पोलीस बऱ्याच दिवसांपासून या टोळीच्या मागावर होते. अखेर नौपाडा पोलिसांना या फसवणुकीच्या घटनेतील आरोपीची माहिती मिळाली आणि त्यांनी या टोळीचा मुख्यसूत्रधार मनीष शशिकांत आंबेकर (40, राहणार- पळस्पे गाव नवी मुंबई व नालासोपारा) यास 14 डिसेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आशा प्रकारे नौपाडा, वागळे आणि कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 11 ठिकाणी फसवणूक केल्याची कबुली त्या ठगाने दिली. या भामट्याकडून 1 लाख 20 हजाराची रोकड व 5 लाख 80 हजाराचे दागिने असा एकूण 7 लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. स्वामी यांनी दिली. अटकेत असलेल्या भामट्याला अजून देखील काही व्यक्तींनी मदत केली असावी असा पोलिसांना संशय असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटकdoctorडॉक्टर