शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव येथे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जीवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 11:45 IST

कोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री पावणे बारा वाजता विशाल शिंदे याच्या विरोधात जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : प्रेम प्रकरणाच्या संशयावरून धुमाळवाडी (नांदगिरी) ता. कोरेगाव येथील विशाल चंद्रकांत शिंदे याने आपल्या भरधाव कारने जोरदार धडक देऊन निलेश जाधव, रा. जळगाव यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कारच्या धडकेत जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव जळगाव रस्त्यावर पाटील हॉस्पिटलच्या पाठीमागे घडली.

कोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री पावणे बारा वाजता विशाल शिंदे याच्या विरोधात जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निलेश जाधव यांच्या पत्नी पूनम निलेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दसऱ्याच्या दिवशी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सुमारास कोरेगाव ते जळगाव रस्त्यावर विशाल चंद्रकांत शिंदे याने निलेश जाधव यांच्यावर नांदगिरीतील आपल्या कुटुंबातील एका महिलेबरोबर प्रेम प्रकरण असल्याचा संशय घेतला, त्यानंतर स्वतःच्या ताब्यातील मारुती वॅगनआर कारने निलेश जाधव हे दुचाकीवरून जळगावकडे निघाले असता पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीला धडक दिल्यानंतर  कार रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकली. यामध्ये निलेश जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कोरेगाव पोलीस ठाण्यात विशाल चंद्रकांत शिंदे याच्या विरोधात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने निलेश जाधव यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात