शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

कर्फ्युदरम्यान सामूहिक बलात्काराचा प्रयत्न; महिलेने आरोपीची दाताने जीभच तोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 20:10 IST

इतर आरोपीही जखमी अवस्थेत आपल्या साथीदाराला पाहून घटनास्थळावरून पळून गेले.

ठळक मुद्देजनता कर्फ्युच्या वेळी एका 65 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला.पीडित वृद्धेने धैर्याच्या जोरावर नराधमांचा डाव उधळला. महिलेने एका आरोपीची जीभ आपल्या दातांनी चावून कापून टाकली

जलपाईगुडी - कोलकत्यातील जलपाईगुडीच्या बाहेरच्या परिसरात जनता कर्फ्युच्या वेळी एका 65 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. जनता कर्फ्यूदरम्यान काही लोकांनी जलपाईगुडीच्या निर्जन रस्त्यावर एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला, परंतु पीडित वृद्धेने धैर्याच्या जोरावर नराधमांचा डाव उधळला. महिलेने एका आरोपीची जीभ आपल्या दातांनी चावून कापून टाकली, त्यानंतर इतर आरोपीही जखमी अवस्थेत आपल्या साथीदाराला पाहून घटनास्थळावरून पळून गेले.

आजीबाईने खूप चांगले केले. आता डॉक्टरांनी देखील आरोपीची जीभ जोडण्यास अक्षम असल्याचे जाहीर केले आणि इतर आरोपींनाही पकडले पाहिजे आणि त्यांचे लिंग कापले पाहिजे होते अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी जलपाईगुडीच्या पहाडपूर भागात राहणारी एक महिला आपल्या घरात एकटी होती. शहरातील जनता कर्फ्यूदरम्यान रस्त्यावर शांतता होती. दरम्यान रॉकी मोहम्मद आणि छोटू मोहम्मद नावाच्या दोन व्यक्तींनी या महिलेच्या घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न केला. दरम्यान, या महिलेने आरोपी रॉकी मोहम्मदच्या जीभेचे लचके तोडले.

एक साथीदार निसटलात्याची जीभ चावल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच महिलेने त्याला पकडले. त्याचवेळी छोटू मोहम्मद घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रॉकी मोहम्मदला जलपाईगुडीच्या जिल्हा रुग्णालयात नेले.

पोलिसांना अद्याप एफआयआर मिळालेला नाहीरुग्णालयाच्या डॉक्टरांनीही रॉकीची जीभ परत जोडण्यास असमर्थता दर्शविली. मात्र, पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि उपचार सुरू केले. आतापर्यंत यासंदर्भात पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नसली तरी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसArrestअटक