शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राखीला पतीकडून मारहाणीचा प्रयत्न; दागिनेही घेतले, गुन्हा दाखल करत पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 11:00 IST

राखीने आरोप केला आहे की, आदिलने तिचे पैसे आणि ४ लाख रुपये किमतीचे दागिने घेतले आणि तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : अभिनेत्री आणि माजी बिग बॉस स्पर्धक राखी सावंत हिने तिचा पती आदिल दुर्राणीवर केलेल्या गंभीर आरोपानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. 

राखीने आरोप केला आहे की, आदिलने तिचे पैसे आणि ४ लाख रुपये किमतीचे दागिने घेतले आणि तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राखीने सोमवारी रात्री पती आदिलविरोधात एफआयआर दाखल केला. तिच्या आईला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाले असते, तर आज ती जिवंत असती, असेही मीडियासमोर सांगत राखीने आदिलला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आदिलने मला रस्त्यावर आणले. मला लुटले, असेही ती म्हणाली. तिचे पैसे आणि आईचे दागिने घेऊन तिने घर सोडल्याचा आरोपही तिने केला. 

बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी तिने तिच्या आईला काही हवे असल्यास ते पुरविण्यासाठी आदिलला १० लाखांचा चेक दिला होता. मात्र, पैसे असूनही माझी आई हॉस्पिटलमध्ये असताना त्याने तिला खर्चासाठी पैसे दिले नाहीत, असेही तिचे म्हणणे आहे, तसेच त्याचे अन्य महिलेसोबत संबंध असल्याचाही तिचा आरोप आहे. राखीने या वर्षाच्या सुरुवातीला एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आदिल खानशी तिच्या लग्नाबद्दल खुलासा करताना सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यांचे लग्न २०२२  मध्ये झाले आणि तिने आदिलच्या सांगण्यावरून ते लग्न गुप्त ठेवले. राखी सावंतचे यापूर्वी रितेश राजसोबत लग्न झाले होते. दोघांनी बिग बॉस १५ मध्ये देखील भाग घेतला होता. 

आम्ही आदिलची चौकशी करत आहोत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर धनावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :Rakhi Sawantराखी सावंतbollywoodबॉलिवूडPoliceपोलिस