शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बाईकवरुन पाठलाग करत आले, महिला थांबताच उतरले अन्... दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंगचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:54 IST

कर्नाटकात दिवसाढवळ्या महिलेची सोन्याची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न झाला.

Chain Snatching Attempt in Karnataka: कर्नाटकमध्ये चेन स्नॅचिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील मुलबागिलू शहरात दिवसाढवळ्या एका महिलेला चेन हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने तिची स्कूटी थांबवली तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. एका आरोपीने महिलेला धक्का देऊन खाली पाडलं आणि तिची चेन हिसकावण्याचा प्रयत्न करू लागला. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

कोलार जिल्ह्यातील संजप्पा बरंगे परिसरात ही घटना घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण आहे. बाईकवरुन आलेल्या दोघांनी स्कूटीवरील महिलेचा पाठलाग केला आणि तिच्या गळ्यातील हार हिसाकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्याची आणि पीडित महिलेची झटापट देखील झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

महिलेने आरडा ओरड केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक तिथे जमू लागले. लोक येत असल्याचे पाहून आरोपींनी ताबडतोब घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने महिलेला गंभीर दुखापत झाली नाही. तसेच चोरट्यांचा सोन्याचा नेकलेस चोरण्याचाही प्रयत्न फसला. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपी दूरवरून महिलेचा पाठलाग करत होते.

व्हिडिओमध्ये आरोपी स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे आणि तपास सुरू केला आहे. ही एक अयशस्वी चेन स्नॅचिंग घटना होती. महिलेच्या ओरडण्यामुळे आणि लोक जमल्यामुळे आरोपी पळून गेला. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही परंतु आरोपीची ओळख पटवून लवकरच त्यांना पकडले जाईल, असं एसपी निखिल बी म्हणाले.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी आणि परिसरात सुरक्षा वाढवावी अशी मागणी ते करत आहेत. लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीChain Snatchingसोनसाखळी चोरी