शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

पोलिसांचा खबरी म्हणून अपहरण करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न

By मनीषा म्हात्रे | Updated: July 14, 2022 21:44 IST

Crime News : गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणारा जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई : गुटख्याच्या बेकायदेशीर विक्रीबाबत पोलिसांना माहिती देत असल्याच्या रागात ३२ वर्षीय तरुणाचे अपहरण करत त्याला लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने मारहाण करणाऱ्या त्रिकूटाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहे. राजेश शेट्टीयारसह तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे.             

ताडदेव परिसरात राहणारा ३२ वर्षीय तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला होता.  तरुणाच्या तक्रारीनुसार, गेल्या ५ ते ६ वर्षांपासून तो राजेश शेट्टीयार आणि तानाजी खोपडे (३५) याला ओळखतो. राजेश हा गुटखा पुरवठादार असून तानाजी त्याच्यासाठी काम करतो. त्यांच्या गुटखा विक्रीबाबत पोलिसांना माहिती दिल्याच्या रागात तानाजीने त्याला बेदम मारहाण करत जीवेठार  मारण्याची धमकी दिली.  ७ मे रोजी तक्रारदार तरुण दुचाकीवरून विक्रोळी येथे आला असताना सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास कारमधून आलेल्या तानाजीने त्याला अडवले. लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने त्याच्यावर हल्ला चढवला. पूढे, कारमधून शिवडी फाटक येथील गोडावून मध्ये नेले. तेथे पोलीस खबरी म्हणून करत असलेल्या कामाबाबत चौकशी केली. त्याने, प्रतिसाद न देताच पुन्हा मारहाण केली. यामध्ये तरुणाची प्रकृती खालावताच तानाजीने त्याला जवळच्या रुग्णालयात सोडले. तेथे त्याला फ्रॅक्चर झाल्याचे समजले. उपचार घेतल्यानंतर त्याने विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.               

पुढील तपासासाठी हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष ५ कडे वर्ग केला. पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण ) बालसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त नामदेव शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सुनीता भोर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. यामध्ये शेट्टीयारसह तिघांना अटक करण्यात आली आहे.छुप्या मार्गाने मुंबईसह महाराष्ट्रात गुटखा विक्रीशेट्टीयार त्याच्या साथीदारांसह छुप्या मार्गाने मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करत होता. तक्रारदारमुळे त्याच्यावर वेळोवेळी कारवाई करत त्याचा माल जप्त करण्यात आला. त्यामुळे त्याचे मोठ्या स्वरूपात आर्थिक नुकसान झाल्याच्या रागात तक्रारदाराला अद्दल घडविण्यासाठी त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस