शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अख्ख्या पोलीस स्टेशनलाच लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 15:11 IST

घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री १२.२१ ते १२.५४ च्या दरम्यान एक तरुण पोलीस ठाण्याला आग लावताना दिसत आहे.

दरभंगा -  बिहारच्या दरभंगा येथील मोरो पोलीस ठाणे रविवारी रात्री काही समाजकंटकांनी पेटवून दिले. पोलीस ठाण्यातच पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. समाजकंटकांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दुचाकीही दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण बॉक्समधून काही ज्वलनशील पदार्थ फवारताना दिसत आहे. फवारणी करून आग लावण्याचा प्रयत्न होतोय याचीही चौकशी होत आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर एसपी सागर कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. पोलीस ठाण्यात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका अज्ञात युवकाचा चेहरा कैद झाला आहे. त्याची पडताळणी केली जात आहे. लवकरच संपूर्ण प्रकरण उघड होईल असं त्यांनी माध्यमांना सांगितले. 

घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री १२.२१ ते १२.५४ च्या दरम्यान एक तरुण पोलीस ठाण्याला आग लावताना दिसत आहे.  त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना रोखण्यासाठी ओडी ड्युटी आणि सेन्ट्री ड्युटी कर्मचार्‍यांच्या कारवायाही तपासल्या जात आहेत असं या प्रकरणाला दुजोरा देताना शहर एसपी सागर कुमार म्हणाले.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेतील संशयित आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे. तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. अटक केलेला युवक खपरपुरा गावातील टनटन ठाकूरचा पुत्र धर्मेंद्र ठाकूर आहे. तर दुसरा फरार आरोपी सीताराम यादव यांचा पुत्र अरुण यादव आहे ज्याच्या अटकेसाठी पोलीस शोध घेत आहेत. तपासात धर्मेद्रने त्याचा गुन्हा कबुल केला. त्याने हे कृत्य का केले याचा पोलीस शोध घेत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी