शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावर असलेल्या पोलीसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 21:19 IST

वाहतूक नियमाचे उल्लंघन केले म्हणून कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअमित बोकारे (३३ ) हे रविवारी रात्री काशिमीरा नाक्याजवळ कर्तव्यावर तैनात होतेगाडीचा मालक हा गाडी चालक सलमान खान (३१) विरुद्ध कारवाई

मीरारोड - चुकीच्या मार्गाने येणारी चारचाकी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीसावरच चालकाने गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री काशिमीरा नाका येथे घडली आहे. सुदैवाने वाहतूक पोलीस बचावला असून आज सोमवारी पोलीसांनी सदर गाडी चालकावर केवळ वाहतूक नियमाचे उल्लंघन केले म्हणून कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.वाहतूक शाखेत कार्यरत असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी अमित बोकारे (३३ ) हे रविवारी रात्री काशिमीरा नाक्याजवळ कर्तव्यावर तैनात होते. त्यावेळी पालिका बसडेपोकडून काशिमीरा नाका दिशेने विरुध्द मार्गावरुन पांढऱ्या रंगाची हुंडाई एसेंट (एमएच ०२ ईएच ४२४९) ही वेगाने येत होती. बोकारे यांनी नाईट मिटींग बारच्या बाहेरील रस्त्यावर ही चाचाकी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. बोकारे वेळीच सावध झाल्याने बचावले.गाडी चालक मात्र पसार झाल्याने पोलीसांनी त्याचा शोध सुरु केला. ती गाडी सिल्वर पार्क भागात एका गॅरेजजवळ उभी केलेली पोलीसांना आढळल्यावर तिला पोलीसांनी जॅमर लावला. आज सोमवारी सकाळी गाडीचा मालक हा गाडी चालक सलमान खान (३१) सह काशिमीरा वाहतूक शाखेत हजर झाल्यानंतर पोलीसांनी सलमानविरुध्द चुकीच्या दिशेने तसेच बेशिस्त वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे याप्रकरणी वाहतूक कायद्यानुसार दंड आकारणी केली असल्याचे वाहतूक पोलिसांकडुन सांगण्यात आले.परंतु पोलीसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न तसेच सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे काही पोलीसांनीच खाजगीत बोलुन दाखवत घटनेचा निषेध केला. या आधी वर्षभरापूर्वी वरसावे नाका येथे फाऊंटन हॉटेलजवळ वाहतूक पोलीस कर्मचारी मंगेश देशमुख यांना वाहनाने धडक दिल्याने ते जखमी झाले होते. दिड महिना उपचारासाठी रजेवर होते. त्या प्रकरणात काशिमीरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीmira roadमीरा रोडcarकारfour wheelerफोर व्हीलर