शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:12 IST

Attempt to burn alive by throwing petrol on the body : या घटनेत  संदीप बाबूराव निकाळजे हा जखमी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनगाव राजा : स्थानिक बसस्टॉपनजीक मद्य पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी दोघाजणांना अटक केली आहे.ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेत  संदीप बाबूराव निकाळजे हा जखमी झाला आहे. प्रकरणी पोलिसांनी जखमी संदीप निकाळजे याच्या आईच्या तक्रारीवरून विजय श्रीराम मुंढे, किरण ऊर्फ गोपाळ रामभाऊ उबाळे (रा. किनगाव राजा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल  करीत त्यांना अटक केली आहे.जखमी संदीप बाबूराव निकाळजे आणि आरोपी विजय श्रीराम मुंढे, किरण ऊर्फ गोकुळ रामभाऊ उबाळे हे किनगाव राजा येथे सोबत मद्यपान करीत होते. त्यातच त्यांच्यात वाद होऊन तो विकोपाला गेला. त्यातच विजय मुंढे आणि गोकुळ उबाळे या दोघांनी संदीप निकाळजे याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला.  त्यात त्यामुळे संदीपच्या अंगावरील टी-शर्ट पेटून त्याच्या दोन्ही हातांना, पोटाला, छातीवर, चेहऱ्यावर तसेच कानाला भाजल्यामुळे जखमा झाल्या आहेत.संदीप निकाळजे याची आई सत्यभामा बाबूराव निकाळजे (५०) यांनी या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश बनसोडे, हेड कॉन्स्टेबल राजू दराडे, गजानन सानप, रोशन परशुवाले, जाकेर चौधरी, जाकेर पठाण हे करीत आहेत. या घटनेत संदीप निकाळजे हा १० ते १५ टक्के भाजला असल्याचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी सांगितले. एकंदरीत घटनाक्रम व घटनेचे गांभिर्य पाहता याप्रकरणात तातडीने पावले उचलून आरोपींनाही अटक करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा